शासनाच्या वतीने राज्यातील व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेल्या स्थानिक संस्था (एल बी टी) कराच्या राज्यातील बंदला पाठिंबा देण्यासाठी आज ‘वाई बंद’ पाळण्यात आला.
एलबीटीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे कारण त्यामध्ये जाचक अटी आहेत. त्या रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. व्ॉट लागू करताना यापुढे दुसरे कोणतेही कर लागू करणार नाही असे तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. एल.बी.टी. आकारणीची व्याप्ती वाढवून ती राज्यातील छोटय़ा मोठय़ा गावापर्यंत आणण्याचा शासनाचा विचार आहे. याला विरोध म्हणून व्यापाऱ्यांच्या शिखर संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शहरातील कापड, भांडी, सराफ, किराणा भुसार, वाई तालुका डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, मालवाहतूकहार आदी इतर संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge response to vyapari strike in wai