हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पुणे, नांदेड शहरामध्ये हज हाउस सुरू करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्याबाबत केंद्रीय हज कमिटीकडे मी पाठपुरावा करणार आहे असल्याचे राज्याचे वत्रोद्योग व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नसिम खान यांनी शनिवारी येथे सांगितले.
कोल्हापूर जिल्हा हज कमिटीच्या वतीने हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी शासनाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री नसिम खान बोलत होते. या वेळी हज कमिटीचे सदस्य जहाँगीर ढालाईत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक, सुरेश कुराडे, सुरेश पाटील,गणी आजरेकर, सलिम बागवान आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा