मापदंडानुसार तपासणी नाही
वारंवार सूचनांनंतरही मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा होत नसल्याने जिल्हय़ातील हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ या तीन तालुक्यांतील कामांबाबत मानव विकास आयुक्तालय हतबल झाले आहे.
या कामांची सरकारने निर्धारित मापदंडानुसार तपासणी करावी. कामात अनियमितता दिसून आल्यास संबंधित अधिकारी त्यास जबाबदार राहतील, असा इशारा मानव विकास मिशनचे आयुक्त कृष्णा भोगे यांनी दिला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा मानव विकास मिशनचे अध्यक्ष नरेंद्र पोयाम यांना भोगे यांनी ३१ ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रात या बाबीकडे लक्ष वेधले आहे. मानव विकास मिशन योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीच सुधारणा नाही. निर्धारित मापदंडानुसार या कामांची तपासणी करावी अन्यथा कोणत्याही कामात अनियमितता दिसून आल्यास त्यात जिल्हा मानव विकास समिती व सर्व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. योजनांच्या कामात सुधारणा होत नसल्याने मानव विकासचा निधी पाण्यात जाणार काय, अशीही चर्चा आहे.

Story img Loader