कर्जतहून येणाऱ्या तसेच कळवा कारशेडमधून बाहेर पडणाऱ्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये मानवी विष्ठेची घाण करणारी एक विकृती संचार करून मोठय़ा प्रमाणात उपद्रव देत असल्याने नोकरदार महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच, बुधवारी सकाळी कल्याणहून फलाट क्रमांक एकवरून सकाळी नऊ वाजता सुटणाऱ्या महिला प्रवाशांच्या डब्यामध्ये मोठय़ा प्रमाणात मानवी विष्ठा आढळून आली.  कल्याण रेल्वे पोलीस या घटनेविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. डाऊन लोकल असल्याने ही गाडी कारशेडमधून बाहेर पडण्यापूर्वीच हा प्रकार घडला असावा. रेल्वे पोलीस प्रत्येक डब्यात जाऊन तपासणी करीत नाहीत, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader