शिरूर अनंतपाळ तालुक्यात एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत दुसऱ्या ग्रामपंचायतीला काम करण्याची मुभा देत शिरूर अनंतपाळ पंचायत समिती व जि.प.ने कायद्याचा भंग केल्याच्या निषेधार्थ साकोळचे सरपंच, १२ सदस्य व ग्रामस्थांनी जि.प.समोर सोमवारी उपोषण सुरू केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या उपोषणास पािठबा दर्शवताना संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
पंचायत राज्य व्यवस्थेत ज्या गावची कामे त्याच ग्रामपंचायतीने करावीत, असे अभिप्रेत आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एसआरएफ अंतर्गत घुगीसांगवी ग्रामपंचायत रस्त्याचे काम करीत आहे. साकोळ येथे बसवेश्वर चौक ते घुगीसांगवी हा रस्ता ५०० किलोमीटरचा आहे. साकोळ गावच्या दलित वस्तीतच हा रस्ता आहे. दोन्ही टोकेही साकोळ गावठाण हद्दीतच आहेत. असे असताना घुगीसांगवी ग्रामपंचायतीच्या नावावर या रस्त्याची निविदा काढण्याचे काम पंचायत समितीने केले व ते मंजूरही झाले. साकोळ ग्रामपंचायत सक्षम असतानाही साकोळ गावात घुगीसांगवी गावातील पंचायत समितीला काम करण्याची परवानगी देण्यामागील पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजकारण असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा