शहरातील नाना-नानी पार्क येथे शहिदांचे भव्य स्मारक व्हावे, या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे गांधी चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या परिजनांनी येथे भेट दिली. मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसनिकांचा दयानंद सभागृहात सत्कार करण्यात आला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या परिवारासमक्ष लातूरकरांनी या शहिदांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प सोडला. या संकल्पपूर्तीसाठी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने सत्याग्रह व आंदोलन करीत आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हे उपोषण केले. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर, पुरुषोत्तम चाटे, राजा चौगुले, पांडुरंग बेंबडे, आकाश गडगळे, राजेश पवार, रामभाऊ जवळगे, शिवराज बारबोले, आकाश िशदे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा