मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे हुतात्मा कुर्बान हुसेन व्याख्यानमाला व काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. ७) डॉ. प्रा. रफिक सूरज यांनी संपादित केलेल्या ‘दस्तक’ या मुस्लिम मराठी कवींच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. रफीक झकेरिया कॅम्पसचे संचालक डॉ. ए. जी. खान यांच्या हस्ते संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य प्रभाकर बागले, तर वक्ते म्हणून डॉ. प्रा. सतीश बडवे व प्राचार्य डॉ. महेंद्र कदम उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी (दि. ८) ‘फाळणीचे गौडबंगाल’ या विषयावर कॉ. विलास सोनवणे यांचे व्याख्यान होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंवाद व वृत्तपत्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, नवव्या अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. जावेद पाशा कुरेशी व प्राचार्य डॉ. बापुराव देसाई उपस्थित राहणार आहेत. रविवारी (दि. ९) ‘काश्मीर प्रश्न : काल व आज’ या विषयावर कॉ. सोनवणे यांचे व्याख्यान होईल. विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. हमीद खान, जात पडताळणी विभागीय आयुक्त एस. एन. कादरी व प्राचार्य डॉ. शेख शाहेद उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी केले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा