नव्या वर्षांत १०,७०० वा विक्रमी प्रयोग करणाऱ्या प्रशांत दामले याने रविवार वृत्तान्तशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. दिग्दर्शकांची शैली, बदलत गेलेले नाटक, निर्मात्याची भूमिका, निर्माता महासंघाचा अध्यक्ष, ‘सुयोग’ सोडण्याची कारणे.. अशा अनेक विषयांवर प्रशांत दामले भरभरून बोलला. त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

० विक्रमी प्रयोगाचं दडपण कितपत आहे? की, हादेखील नेहमीसारखाच एक प्रयोग असेल?
– आता विक्रमी १०, ७०० वा प्रयोग म्हटल्यानंतर दडपण आलंच. कसं आहे, नेहमी करतो त्या प्रयोगातही दडपण असतं. कारण शेवटी हा खेळ आहे. तो दर दिवशी रंगावा लागतो. नेहमीच्या प्रयोगालाही पहिली २०-२५ मिनिटे आम्ही सगळेच काहीशा दडपणाखाली असतो. पण या प्रयोगात दडपण थोडं जास्त असेल एवढंच. सचिन तेंडुलकरचं नाही, शंभर धावा केल्यानंतरही पुढला चेंडू त्याच्यासाठी नवीनच असतो. त्यामुळे आमचंही तसंच आहे.
० गेली ३० वर्षे तू रंगभूमीवर वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करतो आहेस. पुरुषोत्तम बेर्डे ते राजेश देशपांडे अशी मोठी रेंज आहे. यापैकी तुला कोणाची शैली जास्त भावली किंवा कोणत्या दिग्दर्शकाचं काय आवडलं?
– (हसून) या प्रश्नाचं खरं उत्तर तुला कधीच कोणत्याच कलाकाराकडून मिळणार नाही. पण अगदी प्रामाणिक राहून उत्तर देतो. एखादी परफॉर्मिग आर्ट म्हटली की, कलाकार कितीही मोठा असला, तरी त्याच्या हातून चुका होतच असतात. मला नाटक मुळातच कळायला लागलं १९९३-९४च्या सुमारास. मी ‘गेला माधव कुणीकडे’ केलं त्या वेळी. तोपर्यंत आवाजाची पट्टी, रंगमंचावरचा वावर, टायमिंग वगैरे सगळ्याच बाबतीत मी प्रत्येकाकडून शिकत होतो. त्यामुळे मी त्याआधीच्या दिग्दर्शकांच्या शैलीबाबत भाष्य करणं योग्य नाही. शाहीर साबळे, पुरुषोत्तम बेर्डे, दिलीप कोल्हटकर, मंगेश कदम या प्रत्येक दिग्दर्शकाची शैली भिन्न आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. त्या त्या नाटकापुरता प्रत्येकाचाच विचार खूप महत्त्वाचा आणि मोठा होता. शेवटी नाटक ही सांघिक कामगिरी असते. त्यामुळे प्रत्येक जण महत्त्वाचा असतो.

०  पण या सर्व नाटकांपैकी तुझ्यासाठी आव्हानात्मक भूमिका कोणती होती?
– माझ्या आठवणीप्रमाणे ‘लेकुरे उदंड जाहली’ आणि ‘बे दुणे पाच’ या नाटकांमधील माझ्या भूमिका सगळ्यात आव्हानात्मक होत्या. ‘लेकुरे..’ मध्ये मला खूप गाणी होती. तर ‘बे दुणे पाच’ हा फार्स असल्याने त्याचा वेग खूप होता. पाच भूमिका होत्या मला त्यात!
०  तुझ्यावर दोन प्रकारचे आरोप नेहमीच होतात. एक म्हणजे तू दिग्दर्शकशरण अभिनेता आहेस..
– मग त्यात चूक काय? आणि मला काही हा आरोप वाटत नाही. एखाद्या कलाकाराला एखाद्या भूमिकेत फिट बसवण्याचे काम दिग्दर्शकाचं असतं. एकदा दिग्दर्शकाने तेवढं केलं की, कलाकाराला रस्ता कळतो. पण त्यासाठी दिग्दर्शकाचं ऐकायला हवं. कसं आहे, सगळ्यात जास्त वेळा स्क्रिप्ट दिग्दर्शक वाचतो. त्यामुळे ते नाटक त्याला जास्त कळलेलं असतं. लेखक पाया तयार करतो. दिग्दर्शक संपूर्ण इमारत तयार करतो आणि आम्ही कलाकार केवळ आतील रंगरंगोटी करतो. पण घर बांधण्याचं काम त्याचंच आहे. ते त्याला करून देण्यात ‘दिग्दर्शकशरण’पणा कुठे आला? असो.. दुसरा आरोप कोणता?
०  तू प्रेक्षकशरण असल्याचा..
– मला सांग, आपण नाटक कोणासाठी करतो? केवळ आणि केवळ प्रेक्षकांसाठी. मला फक्त माझ्यासाठीच नाटक करायचं असेल, तर मग माझ्यासाठी प्रायोगिक रंगभूमीची दारं उघडी आहेत. पण मला प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. त्यातही माझं प्रत्येक नाटक बघितलंस, तर ते वेगळं आहे. ‘माधव’ वेगळं आहे, ‘प्रियतमा’मध्ये मी श्रीमंत बापाच्या लाडावलेल्या आणि प्रेमात पडलेल्या मुलाची भूमिका केली होती. ‘बहुरूपी’ हे नाटकही खूप अवघड होतं. त्या नाटकात तर खुद्द प्रशांत दामले स्वत:वर टीका करतो, असं होतं. ‘शूऽऽ कुठं बोलायचं नाही’ या नाटकात तर मी त्या वेळी माझ्या वयाच्या मानाने खूपच मोठय़ा माणसाची भूमिका केली होती. माझं म्हणणं एवढंच आहे की, प्रेक्षकांसाठी नाटक करायचं असेल, तर त्यांच्या कलाने भूमिका करण्यात गैर काय? आणि वेगळ्या नाटकाची व्याख्या काय?
०  ३० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकधंद्यात काय बदल झाला, असं वाटतं? किंवा विनोदाची पातळी खालावली आहे, असं वाटतं का?
– माझ्या नाटकांपुरतं विचारशील, तर नाही हं! (हसून) पण एकंदरीत ती खालावली आहे, हे नक्की. नाटकधंद्यात बदल म्हणशील, तर संख्या खूप वाढली आहे नाटकांची. पण त्या तुलनेत प्रेक्षक येत नाहीत. आजकाल पूर्वीसारखे सशक्त लेखन करणारे लेखक खूप कमी लिहितात. नव्या लेखकांकडे वेळ नाही आणि संयम नाही. मला आठवतं, ‘माधव’चं मूळ स्क्रिप्ट १४० पानांचं होतं. पण सध्या कोणाकडेही एवढं लिहिण्यासाठी वेळ नाही. टीव्ही मालिकेचा एक भाग जेमतेम दहा पानांचा असतो. तेही अवघडच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या लेखकांना विचार करायलाही वेळ नाही. चालणारं नाटक हवंय ना, मग आधी चाललेल्या नाटकांचे काही तुकडे एकामागोमाग एक जोडून करायचं विनोदी नाटक! एखादं नाटक विनोदी असेल, तर लोकांनी हसायला हवं. ती हसत नसतील, तर मग त्यांना काहीतरी करून हसवायला हवं, अशी साधारण धारणा असते.
०  तू पुनरुज्जीवित नाटकातही कामं केली आहेस. आधी वेगळ्याच कलाकारामुळे गाजलेली भूमिका करताना दडपण होतं का?
– नाही. याचं कारण, मी ती नाटकं केली, तेव्हा आधी आलेल्या नाटकांना किमान २५ वर्षे उलटून गेली होती. त्यामुळे पिढी बदलली होती. मी त्याआधी झालेली ती नाटकं पाहिली नव्हती. त्यामुळे माझ्या भूमिकांमध्ये मी माझ्या परीने रंग भरण्याचा प्रयत्न केला. तसंच प्रत्येक नाटकाच्या दिग्दर्शकानेही ती वेगवेगळ्या पद्धतीने बसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ती वेगळी झाली.
० तुझ्या चाहत्यांकडून आणि हितचिंतकांकडून एक तक्रार नेहमी ऐकायला मिळते. प्रशांत कधीच आराम करत नाही. त्याबद्दल काय सांगशील?
– माझी ठरलेली वेळ मी पाळत असतो. माझ्या सगळ्याच वेळा ठरलेल्या आहेत. विश्रांती कधी घ्यायची, काम कधी करायचं हे सगळं ठरलेलं असतं. त्याशिवाय मी दर सहा महिन्यांनी सहा दिवस सुटी घेऊन साताऱ्याला जातो. तेथे माझ्या मित्राचं फार्म हाऊस आहे व निसर्गोपचार केंद्र आहे. त्या केंद्रात संपूर्ण ‘बॉडी सव्‍‌र्हिसिंग’ करून घेतली की, मी पुन्हा ताजातवाना असतो. त्यामुळे माझ्या हितचिंतकांएवढीच मलाही माझ्या तब्येतीची काळजी आहे.
० तू स्वत: निर्माता आहेस. सध्याच्या नाटकधंद्यापुढची समस्या काय?
– मुख्य समस्या आहे ती नाटकांची संख्या! तुला सांगतो, गेल्या काही वर्षांत नाटकांची संख्या खूपच वाढली आहे. यंदा एकटय़ा डिसेंबरमध्येच १३-१५ नाटकं येत आहेत. आता मला सांग, तू लग्नात जेवायला जातोस. त्या लग्नात समजा चार प्रकारच्या भाज्या, चार प्रकारच्या पोळ्या, तीन प्रकारचे भात असं जेवण असेल, तर तुझ्याकडे ‘चॉइस’ असतो. मग तू तुला पाहिजे तेच खातोस. प्रेक्षकांनाही ‘चॉइस’ मिळाला की, ते त्यांना पाहिजे तेच नाटक पाहतात. त्याऐवजी एका वर्षांत १०-१५ नाटकं आली, तर प्रेक्षकांचा ‘चॉइस’ कमी होईल आणि चोखंदळ प्रेक्षक प्रत्येक नाटकाला हजेरी लावतील. खूप नाटकांमुळे सगळीच नाटकं लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. चांगल्या तारखांसाठी जास्त स्पर्धा असेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही.
०  तू नाटय़निर्माता संघाचा अध्यक्ष आहेस. या सगळ्या प्रशासकीय कामाचीही तुला आवड आहे का?
– कामाची आवड म्हणण्यापेक्षाही निर्मात्यांची कामं होणं महत्त्वाचं आहे. ही सर्व सरकारी पातळीवरची कामं असतात. मग ते काम होण्यासाठी एखादा माहितीचा चेहरा तिथे गेला, तर काम लवकर होण्याची शक्यता जास्त असते. नाहीतर खूप घाम निघतो. मग एक लिटर घाम गाळण्यापेक्षा अर्धा लिटर गाळूनच काम होत असेल, तर त्यात चूक काय? त्याहीपेक्षा मला हे काम करायला खूप आवडतं.
०  तू ‘सुयोग’ सोडल्यानंतरही तुझ्याबद्दल खूप चर्चा झाली. ‘सुयोग’ने तुला खूप चांगली नाटकं दिली. मग ती संस्था सोडण्यामागचं नेमकं कारण काय?
– निर्मात्याची दु:खं काय, हे मला आधीपासून माहिती होतं. मी आजही सांगतो की, माझ्या आयुष्यातील काही नाटकं ही केवळ ‘सुयोग’मुळेच मिळाली. पण काहीतरी चुकत होतं. आणि कुठे चुकतंय, ते मला कळत होतं. खटकत होतं. बरं, ती चूक सुधारणं हे माझ्याही हातात नव्हतं. डोक्याला डोकं लागण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी मी ‘सुयोग’ सोडली. आणि मग स्वत: निर्माता बनलो.
०  प्रशांतची नाटकं हमखास चालतात, असं नाटय़सृष्टीतले सगळेच निर्माते म्हणत असतात. याचं नेमकं रहस्य काय?
– सातत्य. स्टेजवर काम करताना सातत्य महत्त्वाचं असतं. विश्वासार्हता महत्त्वाची असते. लोक मलाच बघायला येतात, असा गर्व मला अजिबात नाही. ते आम्ही केलेलं नाटक बघायला येतात. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे, नाटक म्हणजे टीमवर्क आहे. पण मी गेली ३० वर्षे आणि समजायला लागल्यापासून गेली २० वर्षे सातत्याने चांगलं नाटक करतोय. त्यामुळे प्रशांतच्या नाटकातून आपल्याला किमान काहीतरी चांगलं मिळेल, असा विश्वास प्रेक्षकांना वाटत असावा. आणि शेवटी प्रेक्षकांची आणि नाटकाची तार जुळणं महत्त्वाचं आहे. ते झालं, तरच तो प्रयोग आणि पर्यायाने ते नाटक रंगतं. माझ्या नाटकांच्या बाबतीत ही तार कदाचित लवकर जुळत असावी.  