मुंबईवर झालेला जीवघेण्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याची कहाणी सांगणारा चित्रपट करायचा निर्णय रामगोपाल वर्माने घेतला तेव्हापासूनच वादाला तोंड फुटले होते. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर वास्तवात या हल्ल्याला जिाून सुरूवात झाली त्या ‘कॅफे लिओपोल्ड’ मध्ये रामगोपाल वर्माने म्युझिक लॉंच केले. रामूचे हे कृत्य म्हणजे असंवेदनशीलतेचा नमूना आहे, अशी टीका त्याच्यावर झाली. येत्या शुक्रवारी ‘२६/११’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्या पाश्र्वभूमीवर कितीही दुखद, भयानक घटना घडली तरी माणूस ते विसरून नव्याने जगण्याची सुरूवात करतो. त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून चित्रपट करताना जिो हा हल्ला झाला तिोच या चित्रपटाची सुरूवात करणे मला उचित वाटले, असा खुलासा रामगोपाल वर्माने केला आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर मानवतेला काळिमा फासणारी भयंकर घटना क्षे घडली ती म्हणजे ‘२६/११’ चा हल्ला. माझ्या डोक्यात या घटनेवर चित्रपटाचा विचार सुरू झाला तोच मुळी ‘कॅफे  लिओपोल्ड’चे मालक फरझाद जेहानी यांना भेटल्यानंतर. जेहानींनी मला त्या रात्रीची घटना ऐकवली तेव्हा माझ्या एक लक्षात आले ते म्हणजे त्या रात्री काय काय घडले हे जवळपास सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण, घटना कशा घडत गेल्या त्या मात्र कोणाच्याच लक्षात आलेल्या नाहीत. तेच आपल्या चित्रपटातून मांडायचे असे मी ठरवले. या सगळ्या घटनाक्रमात ‘कॅफे  लिओपोल्ड’चे सान महत्त्वाचे होते. म्हणून मी तिाून सुरूवात केली. एकाच घटनेकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोने वेगवेगळा असू शकतो, असे रामूने म्हटले आहे.
‘२६/११’ ची कहाणी या चित्रपटात त्यावेळी सहपोलिस आयुक्त असलेल्या राकेश मारिया यांच्या तोंडून उलगडण्यात आली आहे. मारियांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी केली आहे. राकेश मारियांनाच डोळ्यासमोर ठेवून चित्रपट रचण्याचे कारण विचारल्यावर या सगळया हल्ल्यात पोलिसांचा मुख्य अधिकारी, त्यांचा चेहरा म्हणून राकेश मारियाच होते. एखाद्या व्यक्तिच्या भावना दाखवणे वेगळे आणि त्याची व्यक्तिरेखा उचलणे वेगळे. या चित्रपटात नाना पाटेकर हे राकेश मारियांच्या व्यक्तिरेखेत असले तरी शेवटी ते एका पोलिस अधिकाऱ्याच्या भावभावना रंगवतात, हा फरकही समजून घेतला पाहिजे, असे रामगोपाल वर्मा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा