पहिली मालिका आहे ‘पुढचं पाऊल’ आणि नक्कल करणारी मालिका आहे ‘देवयानी’. ‘पुढचं पाऊल’ गेली दीड-दोन वर्षे सुरू आहे. त्यातील आक्कासाहेब ही व्यक्तिरेखा खूप गाजलीय. ‘देवयानी’ सुरू झाली तेव्हा त्यात आक्कासाहेबांचे पुरुषी रूप होते सर्जेराव विखेपाटील. पण हा एक योगायोग मानला जात होता.
पण गेल्या काही दिवसांत तर ‘पुढचं पाऊल’मधील घटना जशाच्या तशा देवयानीत येत आहेत. ‘पुढचं पाऊल’मधील भोंदूबाबा, गरोदर महिलेच्या झोपाळ्याची साखळी तुटणे, आक्कासाहेबांचा डबल रोल आणि आक्कासाहेबांचा आंधळेपणा या अत्यंत महत्त्वाच्या आणि त्या त्या काळात गाजलेल्या घटना ‘देवयानी’त जशाच्या तशा काही महिन्यांतच आलेल्या आहेत.दोन्ही मालिका एकाच वाहिनीवरच्या असल्यामुळे हे कल्पनादारिद्रय़ वाहिनीच्या लक्षात आले नसेल काय? मराठीत चांगले लेखक नाहीत अशी ओरड नेहमीच केली जाते. गेले काही दिवस सातत्याने स्टार प्रवाह टीआरपीत नंबर वन असल्याचा डंका पिटवला जातो आहे. मग टीआरपी मिळवून देणाऱ्या मायबाप प्रेक्षकांची अशी फसवणूक करणे योग्य आहे का, याचा विचारही वाहिनीने करायला हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा