शेतकऱ्यांच्या शेतीमालास बाजारातील स्पर्धेत अधिक भाव मिळावा, यासाठी बाजार समितीच्या धर्तीवर मराठवाडय़ात प्रथमच हिंगोलीत आदर्श कृषी बाजार भरविण्यात येणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते उद्या (सोमवारी) याचे उद्घाटन होणार आहे.
बाजार समितीच्या धर्तीवर खासगी व्यवसायासाठी परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंगोलीतील आडत व्यापारी प्रकाशचंद सोनी यांनी परवाना प्राप्त करून साडेनऊ एकर जमिनीवर सुसज्ज मार्केट यार्ड बांधले. यात उघड लिलाव, जलद वजन (माप), रोख पेमेंट व आडत कमिशन शेकडा दोन रुपये, आडत्यांसाठी व खरेदीदारांना स्वतंत्र दुकाने, गोदाम तसेच स्वतंत्र कार्यालय, शेतकरी निवास, हमाल भवन, इलेक्ट्रॉनिक काटे, सुरक्षा गार्ड आदी सुविधांनी आदर्श कृषी बाजार तयार करण्यात आला आहे. आदर्श कृषी बाजारामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला स्पर्धक निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, असे प्रकाश सोनी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा