जिल्ह्य़ातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेकडे वीजदेयकापोटी साडेदहा कोटींची थकबाकी आहे. देयकाची रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.
महावितरणने ६ मार्च रोजी वीजदेयकाची थकबाकी भरण्यास जिल्हा परिषदेला सांगितले. वीजबिलापोटी १० कोटी ५० लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा  देण्यात आला आहे.
जिल्ह्य़ातील ४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची चालू वीज देयकाचे ४९ लाख रुपये भरले असले तरी या योजनेंतर्गत सर्व गावांना पाणी मिळत नाही. या चार योजनेचा लाभ किती गावांना द्यायचा व वीजदेयक कोण भरणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा