बुद्ध स्तुपाची पुनर्निर्मिती झाल्यास कोल्हापूर जागतिक पर्यटन केंद्र होईल, अशी माहिती भन्ते विनयरख्खीता यांनी दिली.
कोल्हापूरमध्ये बौद्ध स्तूप असल्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळाल्याने याची सत्यता तपासण्यासाठी ते बेंगलोरहून कोल्हापूरला आले आहेत. त्यांच्यासोबत काही संगणक अभियंते आले आहेत
बौद्ध स्तुपाच्या पुनर्निर्मितीसाठी छत्रपती शाहूंच्या अनुयायांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून ते म्हणाले, कोल्हापूरच्या ब्रह्मपुरीतील टेकडीतील विहार अवशेष,  मसाई पठार, पोहाळे, रामिलग येथील गुंफा व शहरातील हा बुद्ध स्तूप यामुळे कोल्हापूर हे जागतिक पर्यटन  होऊ शकते. त्यामुळे या बुद्ध स्तुपाच्या नवनिर्माणाचा तीर्थक्षेत्र आराखडय़ात समावेश करावा, अशी  बौद्ध समााजाची मागणी असल्याचेही भन्ते विनयरख्खीता सांगितले. कोल्हापूरमध्ये सापडलेले बौद्ध स्तूप महाराष्ट्रातील एकमेव आहे. या विषयाला अलीकडे फेसबुक, यूटय़ूब या,सारख्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून भारतात तसेच जगभरात प्रसिद्धी मिळत आहे. याबाबत  जगभरातून विचारणा होत आहे.त्यामुळे या बाबीची सत्यासत्यता पाहण्यासाठी प्रत्यक्ष आल्याचे त्यांनी सांगितले.  या मंडळींनी ज्येष्ठ पत्रकार  आणि गौतम बुद्ध ग्रंथाचे लेखक डॉ. सुभाष देसाई यांच्याशीही चर्चा केली. तसेच त्यांनी ब्रिटिश कागदपत्रे, कोल्हापूर गॅझेटचे पुरावे तपासून पाहिले. ते अस्सल असल्याची त्यांची खात्री पटली आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा