शहर विकासाशी संबंधित महत्त्वाचे विषय व निर्णय महापालिकेच्या शहर सुधारणा समितीत होणे अपेक्षित असताना आम्हाला डावलून परस्पर सगळे निर्णय होत असल्याचा संताप व्यक्त करत ही समितीच बरखास्त करा, असा पवित्रा समितीतील नगरसेवकांनी बुधवारी घेतला. प्रशासनाच्या निषेधार्थ समितीची बैठक तहकूब करण्यात आली.
शहराचा चेहरामोहरा बदलून टाकणारा पर्यटन विकास आराखडा नुकताच मांडण्यात आला, त्याचे सादरीकरण व पाहणीदौराही झाला. मात्र, याबाबत कसलीही माहिती शहर सुधारणा समिती सभापती शुभांगी बोऱ्हाडे व अन्य सदस्यांना नव्हती. त्याचे पडसाद गुरूवारी समितीच्या बैठकीत उमटले. प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करत सभा तहकूब करण्यात आली. तत्पूर्वी, पर्यावरण कक्षाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना बोलावून घेण्यात आले. सीमा सावळे, उल्हास शेट्टी, नारायण बहिरवाडे आदी सर्वच सदस्यांनी त्यांना फैलावर घेतले. मात्र, कुलकर्णी यांनी हात झटकले. आपल्याला आयुक्तांकडून समितीला काही कळवण्याचे आदेश नव्हते, असे ते म्हणाले. त्यावरून सदस्य आणखीच संतापले. जर महत्त्वाचे निर्णय परस्पर होणार असतील तर समिती बरखास्त करा, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्याचा निर्धार केला असून वेळप्रसंगी समिती सदस्यपदाचे राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा