हिंसेचे मूळ सामाजिक विषमतेत आहे. ती नष्ट झाली तरच निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. आम्ही वर्धेकरतर्फे  शिववैभव सभागृहात जीवन गौरव व ज्ञानदीप सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त वध्र्यात प्रथमच उपस्थित झालेल्या डॉ. प्रकाश आमटे यांनी मनोगत व्यक्त केले.     
माणसाची पशुत्वाकडे वाटचाल होत आहे, असे म्हटले जाते, पण ते चुकीचे आहे. पशू चांगले तर माणसे घातक असतात. देश आर्थिक संकटाचा सामना करीत आहे, पण त्यातूनही तो सावरेल. गावपातळीवर आर्थिक विकासाचे नियोजन अधिक सक्षम करावे लागेल. शासकीय योजनांवर विसंबून न राहता प्रत्येकाने आपले योगदान देणे अपेक्षित आहे. आपण आपल्या आयुष्यात उद्दिष्ट निश्चित करून कोणतेही काम केले नाही, सेवाधर्माला जागलो. समस्या सुटत गेल्या, अशी कबुली डॉ. आमटे यांनी दिली.
कार्यक्रमाला डॉ. मंदा आमटे यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख, माजी नगराध्यक्ष  सुनीता ईथापे, सुरेश रहाटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. जिल्ह्य़ातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे आत्मप्रभा देवेंद्र, विठ्ठलराव बुचे, प्रभा घंगारे, नारायणराव खल्लारकर, शोभा कदम, जानराव लोणकर, हाजी जफ रअली, कृष्णराव दोंदडकर, आर.आर.जयस्वाल, डॉ. इंदू कुकुडकर, राजाभाऊ शहागडकर, लीला थुटे, नारायणराव गोस्वामी, वासुदेवराव गोंधळे, माधवी साबळे, मनोहरराव गोडे व आशा नासरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय ज्ञानदीप पुरस्काराने डॉ. जयंत वाघ, डॉ. अनिल दुबे, डॉ. विलास घोडकी, प्रा. नंदिनी भोंगाडे, अजित कोठावळे, डॉ. धनंजय सोनटक्के, शुभदा देशमुख, विजय जुगनाके, विद्यानंद हाडके, संजय ओरके, शाहीन परवीन शेख, किशोर वाघ व महानंद ठाकरे यांना गौरविण्यात आले.
आयोजन समितीचे हरीश ईथापे, संजय इंगळे तिगावकर, प्रकाश येंडे, प्रा. मोहन गुजरकर, प्रा. चंदू पोपटकर, महेंद्र भुते, मुरलीधर बेलखोडे, प्रदीप दाते, नरेश गोडे, पंकज वंजारे यांनी विविध कामांच्या जबाबदाऱ्या चोख सांभाळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा