क्रीडा क्षेत्राकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप, अधिकाऱ्यांची खेळांविषयी असलेली अनास्था व त्यातून होणारी क्रीडा क्षेत्राची हानी, यासारख्या तक्रारी सातत्याने होऊ लागल्यानंतर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यात वैयक्तिक लक्ष घालून नवे क्रीडा धोरण आखण्यात पुढाकार घेतला. क्रीडा विभागात ज्यांना काम करायचे आहे, त्यांनी व्यवस्थितपणे करावे अन्यथा बाहेरचा रस्ता धरावा, असे खडेबोल त्यांनी शुक्रवारी सुनावले.
िपपरी पालिकेचे नवे क्रीडा धोरण तयार करण्यात येत असून त्यासाठी विविध क्रीडा संघटना व पदाधिकाऱ्यांची आयुक्तांनी एका महत्त्वची बैठक घेतली. महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम, पक्षनेत्या मंगला कदम, क्रीडा समितीचे सभापती वनिता थोरात, नगरसेवक महेश लांडगे, नीलेश पांढरकर, रामदास बोकड, शांताराम भालेकर, संपत पवार, जयश्री गावडे, वैशाली काळभोर, माजी नगरसेवक गौतम चाबुकस्वार, सहायक आयुक्त अजीज कारचे, सुभाष माछरे, नीलकंठ पोमण व गोपाल देवांग, कमलाकर झेंडे आदी उपस्थित होते. आयुक्त परदेशी म्हणाले, ‘‘क्रीडा विभागाचे कामकाज सक्षम करण्यासाठी नवे धोरण आखले जात आहे. सर्वाची मते जाणून घेऊन अंतिम धोरण करण्यात येईल व त्यानुसार काम केले जाईल. क्रीडा स्पर्धाचे नियोजन असले पाहिजे. प्रत्येक खेळासाठी एक मैदान असावे, खेळाडूंना अर्थसाहाय्य मिळावे, प्रशिक्षक नेमणे, साहित्य उपलब्ध करणे, अॅकॅडमी स्थापन करणे आदींचे नियोजन करण्यात येईल. राज्यशासनाच्या निर्देशानुसार खेळाडूंना महापालिका सेवेत दाखल करून घेतले जाईल. क्रीडांगणाविषयीचे धोरण ठरवण्यात येईल.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा