पाण्याचे स्रोत नागपूर शहरात चांगले असून पाण्याचा साठाही मुबलक आहे, असे असून देखील इतर ठिकाणची पाणी टंचाई लक्षात घेतली तर या स्रोतांचे संवर्धन व संरक्षण करण्याची गरज आहे. शहरातील प्रत्येकाने तसा प्रयत्न करावा, संकल्प करावा, असे आवाहन महापौर अनिल सोले यांनी केले. साई सभागृहात महापालिकेचे धरमपेठ झोन, जल बिरादरी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन, विदर्भ पर्यावरण कृती समिती, निसर्ग विज्ञान मंडळ, सृष्टी पर्यावरण मंडळ, एबीपी माझा यांच्या वतीने विसाव्या नागपूर जलसुरक्षा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौर अनिल सोले बोलत होते. गिरीश गांधी यावेळी अध्यक्षस्थानी होते.
विहिरी, तलाव यासारख्या पारंपरिक जलस्रोतावर आपण १८६९ पर्यंत अवलंबून होतो. त्यावेळी मुबलक पाणी होते; परंतु त्यावेळी भविष्याचा विचार झाला नाही. नागपुरात नळयोजना २० मे १८७२ रोजी सुरू झाली. लोकसंख्या वाढीबरोबरच पाण्याच वापरही वाढू लागला. शासनाच्या हाती नळयोजना गेली आणि पारंपरिक स्रोतावरील अधिकारही आपण गमावला. स्रोतांच्या संरक्षण व संवर्धनाकडे परिणामी दुर्लक्ष झाले. सुरुवातीला १३ मैल पाण्याच्या लाईनवरून आपण आज २१०० किमी लाईनवर आलो आहोत. ६४० एमएलडी पाणी प्रती व्यक्ती २५६ लिटर पाणी देत आहोत. तरीसुद्धा पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. याला योग्य नियोजन व नीट वितरण व्यवस्थेचा अभाव कारणीभूत आहे, या वस्तुस्थितीकडे महापौरांनी लक्ष वेधले.
पाण्यासाठी जनता आक्रोश करत असून त्याचा सामना नगरसेवक व महापौर यांना करावा लागतो. या सवार्ंवर विचार, उपाययोजना करत असताना पावसाळा येतो. पावसाला सुरुवात झाल्यानंतर प्रत्यक्षात विचार राहून जातो. त्यानंतरचा काळ उलटून पुन्हा एप्रिल महिन्यात पाणीप्रश्न समोर येतो. हे संपूर्ण चक्र संपविण्यासाठी चालू २०१३-१४ या वर्षांत प्रत्येकाने समस्येचा विचार करायला हवा. यासाठी घरासमोर हिरवळ राहील, याची काळजी घेण्याचा संकल्प आणि कार धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणार नाही, हा संकल्प करण्याची गरज आहे. या विचाराने पाण्याचे नीट व्यवस्थापन केल्यास नागपूर शहर सााऱ्या देशात रोलमॉडेल ठरेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. यावेळी उपमहापौर संदीप जाधव, मनपाचे स्थायी अध्यक्ष अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त श्याम वर्धने, आमदार सुधाकर देशमुख, विकास ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अंश आणि साक्षी या छोटय़ा बालकांनी केले.
जलस्रोतांचे आतापासूनच संवर्धन न केल्यास गंभीर स्थिती -महापौर
पाण्याचे स्रोत नागपूर शहरात चांगले असून पाण्याचा साठाही मुबलक आहे, असे असून देखील इतर ठिकाणची पाणी टंचाई लक्षात घेतली तर या स्रोतांचे संवर्धन व संरक्षण करण्याची गरज आहे. शहरातील प्रत्येकाने तसा प्रयत्न करावा, संकल्प करावा, असे आवाहन महापौर अनिल सोले यांनी केले. साई सभागृहात महापालिकेचे धरमपेठ झोन, जल बिरादरी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन, विदर्भ
आणखी वाचा
First published on: 04-06-2013 at 09:27 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If we not serious about enrichment of water then condition will be critical mayor