कोल्हापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभेवेळी राष्ट्रगीत सुरू असताना नगरसेवकांनी गोंधळ सुरूच ठेवला होता. त्यामुळे राष्ट्रगीत अवमान झाल्याबद्दल तत्कालीन महापौर, पदाधिकारी व ७२ नगरसेवक यांच्याविरुद्ध महापौर संजय िशदे यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. २००६-०७ मध्ये हा प्रकार घडला होता.
याबाबत एका वेळी सर्व संशयित नगरसेवक न्यायालयात हजर राहू न शकल्याने दरवेळी पुढील तारीख दिली जात होती. आजही संशयित नगरसेवक हजर न राहिल्याने न्यायाधीश एस. डी. अवसेकर यांनी सुनावणीसाठी १८ जून ही पुढील तारीख दिली आहे. या वेळी नगरसेवकांनी दोन दिवसांनंतरची तारीख देण्याविषयी वकिलांमार्फत आग्रह धरला, मात्र १५ दिवसांनंतर सर्व लोकांनी वेळेवर हजर राहण्याची सूचना करत न्यायाधीश एस. डी. अवसेकर यांनी त्यांना पुढील तारीख दिली. आज फिर्यादी महापौर िशदे न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रगीत अवमानप्रकरणी पुन्हा पुढची तारीख
कोल्हापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभेवेळी राष्ट्रगीत सुरू असताना नगरसेवकांनी गोंधळ सुरूच ठेवला होता. त्यामुळे राष्ट्रगीत अवमान झाल्याबद्दल तत्कालीन महापौर, पदाधिकारी व ७२ नगरसेवक यांच्याविरुद्ध महापौर संजय िशदे यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-06-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ignorance towards insulting the national anthem