यावर्षीपासून पहिल्यांदाच राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाइन करण्यात येणार असून २४ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. नागपुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढली असताना जागा कमी आणि अर्ज जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. संस्थेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १२०० जागा उपलब्ध असून यावर्षी संस्थेमध्ये प्रथमच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून तशा सूचना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत.
२४ जून ४ जुलै पर्यत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. यानंतर ९ जुलै रोजी ऑनलाइन यादी पसिद्ध केली जाणार असून १० जुलैला काही तक्रारी किंवा सूचना असल्यास त्यासाठी वेळ देण्यात आला आहे आणि ११ जुलैला यादी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्राामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया कठीण असली तरी त्यांना याच पद्धतीने प्रवेश घ्यावा लागणार आहे. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थेमधून ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची व्यवस्था करण्यासंदर्भात विचार सुरू असून त्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा