आयआयटी मुंबईत सन १९६४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या संमेलनाच्या वेळी गरजू पण हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संगणक किंवा लॅपटॉप तसेच सॉफ्टवेअर घेण्यासाठी ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
१९६४ मध्ये उत्तीर्ण झालेले ४० विद्यार्थी तब्बल ५० वर्षांनी एकत्रित आले होते. यावेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. याचबरोबर सध्या आयआयटीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणाही केली. या कार्यक्रमाला आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. १९६४चे बहुतांश विद्यार्थी हे सध्या विविध सरकारी, खासगी कंपन्यांमध्ये बडय़ा पदावर कार्यरत आहेत.

Story img Loader