सर्वाधिक परदेशी कलाकारांना सामावणारा महाविद्यालयीन महोत्सव हा आपला लौकिक मुंबई-आयआयटीच्या ‘मूड इंडिगो’ने यंदाही कायम राखत तब्बल १५० परदेशी कलाकारांना आपल्या पवई येथील कॅम्पसवर आमंत्रित केले आहे. मूड इंडिगोच्या निमित्ताने ‘सिंपल प्लॅन’चा कॅनेडियन बॅण्ड, डीजे लॉईड, विनोदवीर मायकेल लॉझियर, स्टटंमन मॉझियर गस्टो यांच्यासारख्या परदेशी कलाकारांची मांदियाळी आयआयटीच्या प्रांगणात अवतरली आहे.
गेल्या वर्षी तब्बल १४० परदेशी कलाकार सहभागी झाले होते. हा विक्रम ‘लिम्का वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदविला गेला होता. यंदा १५० परदेशी कलाकारांना बोलावत मूड इंडिगोने आणखी मोठी झेप घेतली आहे. २० ते २३ डिसेंबर हे चार दिवस मूड इंडिगोने बहुरंगी कार्यक्रम आणि स्पर्धाची पेरणी पवईच्या कॅम्पसवर ठिकठिकाणी केली आहे. चार दिवस विविध परिसंवादांच्या निमित्ताने ‘चक दे’, ‘इक्बाल’चे संगीतकार सलीम आणि सुलेमान, बीबीसीचे माजी ब्युरो चीफ मार्क टली, मास्टर शेफ विकास खन्ना, दिग्दर्शक प्रकाश झा, कोमल नाहटा, रॉनी स्क्रुवाला, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार पॉब्लो बाथरेलोम्यू आदी ऐकण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय गेट युवर हार्ट ऑन, नो पॅड्स नो हेल्मेटसारख्या आल्बममुळे चर्चेत आलेल्या कॅनडाच्या ‘सिंपल प्लॅन’ बॅण्डवर आणि लॉईड या जगप्रसिद्ध डीजेच्या संगीतावर थिरकता येणार आहे. मॅन्डोलीनवादक स्नेहशीष मुझुमदार, जलतरंगवादक सिद्धेश बिचोलकर आदी भारतीय कलाकारांसोबत परदेशी वादकांची जुंपलेली जुगलबंदी हे आणखी एक आकर्षण.
मोठ्ठाले पपेट, विविध कलाबाजी, संगीत आणि नृत्यावर आधारलेल्या ब्राझिलीयन कार्निव्हलच्या धर्तीवर मूड इंडिगो प्रथमच परदेशी कार्निव्हलची धमाल भारतात आणणार आहे. स्टंट कॉमेडियन व्ॉकी चाड, फायर आर्टिस्ट जॅसन डिव्हाड, एस्केप आर्टिस्ट मॉझियर गस्टो, तरवारबाज मुरी मॉलॉय, अफलातून विनोदवीर मायकेल लॉझियर हे परदेशी स्टंटबाज उपस्थितांना आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावतील. याचबरोबर जर्मन, इटली, सौदी, श्रीलंका आदी परराष्ट्रांतून आलेले विद्यार्थी आपले पारंपरिक खेळ, पाककृती सादर करतील. २३ डिसेंबरला सलीम आणि सुलेमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने मूड इंडिगोची सांगता होईल. संपर्क – ६६६.े्िर.१ॠ
शाळकरी मुलांना पहिल्यांदाच ‘एंट्री’
‘स्पेलिंग बी इंडिया’सोबत आयआयटीने मूड इंडिगोमध्ये प्रथमच शाळकरी मुलांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात कठीण इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग, उच्चार आणि अर्थ ओळखण्याची कामगिरी मुलांना पार पाडावी लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा