* मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हे
* ७० बेरोजगारांची लाखो रुपयांनी फसवणूक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २९ लाख रुपयांनी दोन बेरोजगारांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून सीबीआयने मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यासह तिघे व त्यांच्या अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करीत शहरात चार ठिकाणी बुधवारी अचानक झडतीसत्र राबविले. रेल्वेसह विविध शासकीय खात्यांचे लेटर हेड्स व अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. रॅकेटमधील आरोपींनी सत्तरहून अधिक बेरोजगारांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचे उघड झाले. या घटनेने रेल्वे वर्तुळात खळबळ उडाली.
मध्य रेल्वेच्या टीएनसी विभागाचा प्रमुख विजय गुरुप्रसाद पटेल (रा. रेल्वे वसाहत अजनी), गणेश एचआरडी एजंसीचा संचालक बिरेंद्रसिंग राजकुमार खैरवार (रा. वैशालीनगर डिगडोह), अर्चना मेहता (रा. सन्मान अपार्टमेंट, हिंगणा रोड) ही आरोपींची नावे आहेत. बिरेंद्रसिंग खैरवार हिंगणा मार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अजय कडू खून प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात आहे. रघुवीरसिंग निर्वाण व विशाल वाघमारे (रा. कामठी) हे दोघे फिर्यादी आहेत. मध्य रेल्वेत चतुर्थ श्रेणी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून या तीन आरोपी व त्यांच्या साथीदारांनी एकूण २९ लाख रुपये रोख व धनादेशाच्या स्वरुपात घेतले. त्यानंतर मुंबईत नेऊन वैद्यकीय चाचणी करवून घेतली. त्यानंतर रघुवीर व विशाल या दोघांना नियुक्ती पत्रे आली. नोकरी मिळाल्याच्या आनंदात हे दोघेही मध्य रेल्वेच्या कार्यालयात गेले. तेथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला. या पद भरतीसाठी मध्य रेल्वेने कुठलीही जाहिरात दिली नव्हती आणि नियुक्तयाही केलेल्या नाहीत, असे तेथे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रघुवीरसिंग निर्वाण व विशाल वाघमारे (रा. कामठी) या दोघांनी सेमिनरी हिल्सवरील दूरदर्शनसमोर असलेल्या सीजीओ कॉम्प्लेक्समधील सीबीआय कार्यालयात केली. पोलीस अधीक्षक संदीप तामगाडगे यांनी या तक्रारीची शहानिशा केली.
मध्य रेल्वेच्या टीएनसी विभागाचा प्रमुख विजय गुरुप्रसाद पटेल, गणेश एचआरडी एजंसीचा संचालक बिरेंद्रसिंग राजकुमार खैरवार, अर्चना मेहता व त्यांच्या अनोळखी साथीदारांविरुद्ध सीबीआयने सोमवारी गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या विविध पथकांनी आज बुधवारी सकाळी मध्य रेल्वे स्थानकावरील टीएनसी कार्यालय, विजयचे अजनी रेल्वे वसाहतीमधील घर, अत्रे लेआऊटमधील एका इमारतीत असलेले गणेश एचआरडीचे कार्यालय, अर्चना मेहताचे हिंगणा मार्गावरील घर या चार ठिकाणी अचानक छापे घालून झडती सुरू केली. या झडतीत मोठय़ा प्रमाणत खोटी प्रमाणपत्रे, खोटी नियुक्तीपत्रे, कॉल लेटर्स, ओ अँड जी सी, एमएसईबी, शिक्षण खाते, रेल्वे आदींसह विविध शासकीय खात्यांचे लेटर हेड्स व इतर कागदपत्रे, शिक्के, उमेदवारांची यादी व इतर कागदपत्रे सापडली.
गणेश एचआरडीच्या नावाने आरोपींनी अत्रे लेआऊटमधील एका इमारतीत कार्यालय सुरू केले. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेकांना फसविले. मध्य रेल्वेत चतुर्थ श्रेणी पदासाठी सत्तरहून अधिक बेरोजगारांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतले. या सर्वाना रेल्वेच्या नावाने खोटी कागदपत्रे पाठवून मुंबईला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा खोटी नियुक्ती पत्रे पाठवून भुसावळ येथील झोनल ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी पाचारण केले. मात्र, लगेचच पुन्हा पत्र पाठवून हे प्रशिक्षण तूर्त रद्द केले असल्याचे कळविले. बेरोजगारांना फसविण्याचे हे मोठे रॅकेट असल्याचे सीबीआयच्या कारवाईत उघड झाले. त्यात वरिष्ठांचा सहभाग असल्याच्या शंकेने सीबीआयने त्वरेने चौकशी सुरू केली आहे. विजय गुरुप्रसाद पटेल (रा. रेल्वे वसाहत अजनी) व अर्चना मेहता (रा. सन्मान अपार्टमेंट, हिंगणा रोड) या दोन आरोपींना सायंकाळी सीबीआयने अटक केली.