मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कोणताही पक्षपात झालेला नसून तपासामध्ये जे निष्पन्न झाले त्यानुसारच कारवाई करण्यात आली, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी सांगली येथे पत्रकार बठकीत सांगितले. या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पुण्यात व्यक्त केलेले मत यापूर्वीही अनेक वेळा व्यक्त केले आहे. त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी अल्पसंख्याक तरुणांच्यावर कारवाई केली होती. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. याबाबत छेडले असता गृहमंत्री पाटील यांनी सांगितले की, पवार यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलेले नसून यापूर्वी वेळोवेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कोणीही गर अर्थ काढू नये. बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये जे निष्पन्न होत गेले त्यानुसार पोलिसांनी तपास केलेला आहे. त्यामुळे या तपासात पक्षपात झाला असे म्हणता येणार नाही. डान्सबारबंदीबाबत अ‍ॅडव्होकेट जनरल यांचा अहवाल आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बठक घेतली जाईल. या बठकीनंतरच या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
सांगली पोलिसांच्या घरांसंदर्भात अहवाल मागविला असून लवकरच मंत्रिमंडळाच्या बठकीत पोलिसांच्या घरांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगून पाटील यांनी सांगितले की पाऊस न पडलेल्या भागांमध्ये चारा छावण्या आणि टँकर सुरू ठेवण्याबाबत तालुका घटक धरण्याऐवजी गाव हा घटक धरून निर्णय घेतला जाईल. सांगली जिहय़ातील जत,आटपाडी भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी अद्याप गंभीर स्थिती आहे. या दुष्काळी भागातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा