अन्यायी कृषीपंपाच्या वीज दरवाढीस विरोध करण्यासाठी व विजेची पोकळ थकबाकी विरोधात गुरूवारी ३ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते डॉ.एन.डी.पाटील, प्रताप होगाडे, अशोक पाटील-किणीकर, माजी आमदार शिवाजीराव नाईक,संपतराव पवार-पाटील, संजय घाटगे आदी करणार आहेत, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्य शासन व महावितरण कंपनीने ऑगस्ट २०१२ मध्ये कृषीपंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्था यांना जादा दराने (७२ पैसे) प्रति युनिट, डिमांड चार्ज व इतर आकारणीसह कृषीपंपाची बिले पाठविलेली आहेत. ती बिले पूर्णपणे चुकीची व अन्यायकारक असल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. ही वीज दरवाढ एकतर्फी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा न करता केलेली आहे. तरी, ही दरवाढ कमी करून कृषीपंपाची बिले भरून घ्यावीत, वाढीव बिलांसाठी तगादा लावू नये व पोकळ थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करू नये, यासाठी गुरूवारी ३ जानेवारी रोजी येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, सोमवारी ७ जानेवारीला सांगली व त्यानंतर सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्य़ातही जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार बैठकीस प्रा.एन.डी.पाटील, अशोक पाटील-किणीकर, प्रताप होगाडे, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, संजय घाटगे, बाबासाो पाटील-भुयेकर आदी उपस्थित होते.
कृषीपंप वीज दरवाढीविरोधात ३ जानेवारीला मोर्चा
अन्यायी कृषीपंपाच्या वीज दरवाढीस विरोध करण्यासाठी व विजेची पोकळ थकबाकी विरोधात गुरूवारी ३ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते डॉ.एन.डी.पाटील, प्रताप होगाडे, अशोक पाटील-किणीकर, माजी आमदार शिवाजीराव नाईक,संपतराव पवार-पाटील, संजय घाटगे आदी करणार आहेत, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-12-2012 at 09:37 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur on 3rd january farmers march against price hike in electrcity for krishi pump