नसíगक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्हा पर्यटनासाठी अनुकूल असतानाही शासन व प्रशासनाच्या नियोजनाअभावी पर्यटन स्थळांच्या विकासापासून दूर आहेत. जिल्ह्य़ातील हजारो तरुणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या व्यवसायाकडे शासनाने लक्ष दिल्यास जिल्ह्य़ाच्या आíथक विकासाला मोठा हातभार लागू शकतो. या संदर्भात योग्यप्रकारे नियोजन करण्याची गरज आहे. गोंदिया जिल्ह्य़ाची नागझिरा अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानामुळे सर्वदूर ओळख आहे. यासाठी फक्त वन विभागच आड येत नाही, तर त्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभावही मुख्य कारण आहे. काही वर्षांपूर्वी वन विभागाने यासाठी गोंदियावरून बसेसची सोय करण्याची घोषणा करून योजनाही आखली होती, मात्र ती अद्यापही प्रत्यक्षात आलेली नाही.   
काही वर्षांपूर्वी नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यानातील प्राणीसंग्रहालय वन्यजीव विभागाची व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने मोडकळीस आल्यानंतर तेथील पर्यटकांचा ओघही कमी झालेला आहे. नागपूरचे हिवाळी विधिमंडळ सत्र सोडले तर इतर वेळी तेथे शुकशुकाट असतो. हिवाळ्यात या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी असते. युरोपियन डक, पीनटेक, ब्राम्हणी डक, कॉमन कुट, शेकाव्या गार्गनी, गडनाल, मलार्ड, स्पारूविल डक, कॉमन टील, रेडकेस्टेड, पोचार्ड, टफडेल डक, ग्रेलॅज गूज या पक्ष्यांचे थवेच्या थवे येतात. विदर्भातील पक्षीमित्रांसाठी ही पर्वणी असते. त्यांचा प्रयत्नही असतो, मात्र प्रवाशांसाठी कुठलीही सोय नसल्याने पर्यटक येण्यासाठी टाळतात. यात मात्र नुकसान होत आहे हे जिल्ह्य़ाचेच. नागझिरा व नवेगावबांध ही स्थळे वन्यजीव व वनविभागाच्या अधीन आहेत. जोपर्यंत हे दोन्ही विभाग यासंदर्भात पुढाकार घेत नाही तोपर्यंत जिल्ह्य़ाला लाभ मिळणार नाही. यासाठी या विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. या दोन्ही स्थळांव्यतिरिक्त गोंदियाजवळच नागरा येथील शिवमंदिर, भरव मंदिर, प्राचीन ऐतिहासिक बिरसी येथील विमानतळ, कामठा येथील शिविलग, आमगाव तालुक्यातील पद्मपूर येथील भवभूतीचे स्थळ, सालेकसा येथील गडमातेचे मंदिर, र्देकसा येथील हाजरा फॉल, आदिवासींचे श्रद्धास्थान कचारगड गुहा, देवरी तालुक्यातील पुजारीटोला व शिरपूर धरण, अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.     

Story img Loader