नवेगावबांध येथील एका डॉक्टरचा अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी रात्री नवेगावबांध-भिवखिडकी मार्गावरील भुरसी जंगल शिवारात उघडकीस आली. डॉ. राधेश्याम रामू भेंडारकर (३८, रा. भिवखिडकी) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण नवेगावबांध परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. राधेश्याम भेंडारकर नवेगावबांध येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. रात्री सुमारे ८.३० वाजेपर्यंत अनेकांनी नवेगावबांध येथे त्यांना पाहिले. लहान भावाने रात्री ९.३० वाजता डॉ. राधेश्यामच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तेव्हा संपर्क होऊ शकला नाही,
मात्र मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह भुरसी जंगल शिवारात नवेगावबांध-भिवखिडकी मुख्य मार्गापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावरील एका कच्च्या रस्त्यावर पडलेला होता.
डॉक्टर भेंडारकर यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे अनेक घाव होते. शिवाय, गुप्तांगावरही जखमा आढळल्या. कवटीवर खोलवर जखम झाल्याने त्याच्या मेंदूतून बराच रक्तस्त्राव झालेला होता. मृतदेहाजवळ मोटारसायकल पडलेली होती. डॉक्टर भेंडारकर यांच्या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले; परंतु श्वानपथक केवळ घटनास्थळाच्या २० फुटापर्यंत फिरले, मात्र मारेकऱ्यांपयर्ंत पोहोचू शकले नाही.
घटनास्थळी अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. घटनास्थळाला पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी भेट दिली. मारकऱ्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. फिर्यादी विवेक बोरकर यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवेगावबांधचे पोलीस निरीक्षक वाय.एस. हांडे, सहा.पोलीस निरीक्षक व्ही.एस. लोकरे पुढील तपास करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा