सहकार भारतीचे मुखपत्र असलेल्या ‘सहकार सुगंध’ च्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेत सोलापूर जनता सहकारी बँकेला पश्चिम प्रांत विभागाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
शेडय़ुल्ड बँकेचा दर्जा असलेल्या व सोलापूर जिल्ह्य़ातील सहकारी बँकिंग क्षेत्रात लौकिकप्राप्त ठरलेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेने सादर केलेला वार्षिक अहवाल सवरेत्कृष्ठ ठरला. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित एका समारंभात सहकार विभागाचे अपर निबंधक दिनेश ओऊळकर यांच्या हस्ते सोलापूर जनता बँकेचे उपाध्यक्ष भूपती सामलेटी व संचालक महेश अंदेली यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्य सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव उदय जोशी यांच्यासह शेखर चळेगावकर, भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेत सोलापूर जनता बँक प्रथम
सहकार भारतीचे मुखपत्र असलेल्या ‘सहकार सुगंध’ च्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेत सोलापूर जनता सहकारी बँकेला पश्चिम प्रांत विभागाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
First published on: 08-02-2013 at 08:16 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In state level annual report competition solapur janata bank stood first