जिल्हय़ातील सोळा बँकांच्या सर्व शाखांनी मिळून यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ७६० कोटी रुपये इतके पीककर्ज जुल अखेपर्यंत वाटप केले आहे. दिलेल्या उद्दिष्टांपकी ७२ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.
बीड जिल्हय़ात गतवर्षीच्या खरीप हंगामात एकूण २ लाख २८ हजार ७९५ ग्राहकांना ८११ कोटी ५८ लाखांचे पीक कर्जवाटप करण्यात आले होते. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सर्व बँकांना १ हजार ५२ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. जुल अखेपर्यंत २ लाख ९ हजार ९७५ ग्राहकांनी मागील वर्षांच्या ६५२ कोटी ९३ लाख ७७ हजार रुपयांच्या कर्जाचे नवे जुने केले आहे. नवीन ग्राहक व नवे जुने करुन वाढीव कर्ज घेणाऱ्या एकूण १८ हजार ३८३ ग्राहकांना १०६ कोटी ७४ लाख ५३ हजार इतके पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.

Story img Loader