भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याच्या पाच पिढय़ांचा इतिहास उलगडणाऱ्या ‘प्रज्ञासूर्याची प्रकाश किरणे’ या कॉफीटेबल ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले. आंबेडकर, त्यांचे पूर्वज आणि वारसदार यांच्या कारकिर्दीचा त्यात आढावा घेण्यात आला आहे.
डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते या ग्रंथाचेअलीकडेच प्रकाशन करण्यात आले. प्रज्ञा कम्युनिकेशनने हा आगळा वेगळा ग्रंथ प्रकाशित केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर यांच्यापासून त्यांच्या पुढील वारसदारापर्यंतच्या पाच पिढय़ांच्या जीवनप्रवासावर या ग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे. या समारंभाला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक एम.सी. कुलकर्णी, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती प्रा. रमाकांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या ग्रंथाच्या माध्यमातून रामजी आंबेडकर, बाबासाहेब आणि भय्यासाहेब आंबेडकर यांचा एकत्रित इतिहास लोकांसमोर आणल्याबद्दल आनंदराज यांनी या ग्रंथाच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या कल्पना कांबळे, श्रुती मुरकूटकर, गीता कोळसुमकर, दीपाली पवार, साधना राजवाडकर यांचे अभिनंदन केले.
संकेतस्थळ निर्मितीसाठी मार्गदर्शन
अनंत फाऊंडेशनतर्फे सामाजिक व शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात संकेतस्थळांची निर्मिती करून देण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९८६९१३९२५२ आणि ९९३०९२४५०३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रज्ञासूर्याच्या प्रकाशकिरणांचा झोत
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याच्या पाच पिढय़ांचा इतिहास उलगडणाऱ्या ‘प्रज्ञासूर्याची प्रकाश किरणे’ या कॉफीटेबल ग्रंथाचे
First published on: 19-10-2013 at 06:43 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inaugration of pradnyasuryachi prakash kirane