जिल्ह्य़ात पाच दुय्यम निबंधक कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले असून या कार्यालयांमुळे त्या त्या भागातील नागरिकांची सोय होणार आहे.
नाशिकमध्ये द्वारका चौकात शेतकरी संघाच्या इमारतीत सहदुय्यम निबंधक कार्यालय सहाचे उद्घाटन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नयना गुंडे यांच्या हस्ते तर, सहदुय्यम निबंधक कार्यालय सातचे उद्घाटन सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते झाले. सहदुय्यम निबंधक कार्यालय सहा येथे उमेश शिंदे आणि सात येथे संतोष भातंबरेकर यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली आहेत. यावेळी सहदुय्यम निबंधक अधिकारी कैलास दवंगे आदी उपस्थित होते.तसेच मालेगाव शहरात रॉयल हब इमारतीत सहदुय्यम निबंधक (वर्ग २) कार्यालय तीन, निफाड तहसील कार्यालयात दुय्यम निबंधक (श्रेणी १) दोन तर, सिन्नर येथील अल्पबचत भवनात दुय्यम निबंधक (श्रेणी १) दोन या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा