कल्याण पालिकेचे आर्थिक नियोजन ढासळले
विकासकामांच्या नावाखाली काही कोटी रुपयांचा दौलतजादा करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला चालू आर्थिक वर्षांतील महसुली उत्पन्नाचे लक्ष्य गाठणे जवळपास अशक्य बनले असून आर्थिक आघाडीवर महापालिकेचा कारभार अपयशी ठरल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत विविध करांच्या माध्यमातून ७४१ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पालिकेने आखले. प्रत्यक्षात ४८३ कोटी रुपयांची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ५०० कोटी रुपयांचा आकडाही गाठता आला नसल्याने महसुली उत्पन्नात सुमारे २५८ कोटींचा खड्डा पडला आहे. मोबाइल टॉवरच्या माध्यमातून पालिकेस २१ कोटी, जमीन करापोटी १३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेची अवस्था उत्पन्न
आठ आणे खर्च रुपया अशी झाली आहे.
मालमत्ता कराला ग्रहण
मालमत्ता कराचे २१३ कोटी वसुलीचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात १५७ कोटी वसूल झाले आहेत. कर विभागप्रमुख तृप्ती सांडभोर यांनी कर वसुलीचे नियोजन केल्याने याच विभागाने गेल्या वर्षी २०० कोटीहून अधिक वसुली केली होती. या वर्षी शिवसेनेचे नगरसेवक कैलास शिंदे यांनी विकासकांची ‘तळी’ उचलून त्यांना ‘आयओडी’ ऐवजी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रापासून मुक्त जमीन
कर आकारावा अशी मागणी केल्याने, विकासकांनी पुढील काळात या
करात सूट मिळेल, असा विचार
करून हा कर भरणा थांबवला
आहे.
आयुक्त भिसे यांनी विकासकांविषयी ‘बोटचेपे’ धोरण स्वीकारल्याने मालमत्ता करात ५६ कोटीचा फटका बसला आहे. विकासकांनी जमीन कराची एकूण १३८ कोटीची थकबाकी थकवली आहे. मालमत्ता कराची भांडवली कर वसुली ४०० कोटी आहे. त्यामुळे झालेला तोटा मोठा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा