डोंबिवली ते बदलापूर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी कल्याणमध्ये आयकर सेवा केंद्र नुकतेच कार्यान्वित झाले आहे. खडकपाडा येथील आयकर भवनात तळमजल्यावर कार्यान्वित झालेल्या या एक खिडकी योजनेमुळे विवरण पत्र भरणे, आयकर भरणे तसेच परतावा मिळणे अधिक सुलभ होणार आहे. ठाणे विभाग आयकर आयुक्त आनंददीप या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना करदाते आणि सल्लागारांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कल्याण कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष निशिकांत बुधकर, भिवंडीचे विरेन पोपट, डोंबिवलीचे एन. ए. कुलकर्णी आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Story img Loader