प्राप्तीकर दात्यांना आपल्या तक्रारींवरील कार्यवाहीची माहिती देणाऱ्या ‘आयकर सेवा केंद्रा’ची (आस्क) स्थापना येथील आयकर भवनात करण्यात आली असून त्याचे उद्घाटन आज मुख्य आयकर आयुक्त आर. के. रॉय (पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले. एक खिडकीप्रमाणे असलेली ही योजना प्राप्तीकर दात्यांच्या तक्रारींच्या चौकशीसाठी अत्यंत उपायुक्त असल्याचे त्यांनी  सांगितले.
पुणे विभागातील प्राप्तीकर कार्यालयात ३१ मार्चपूर्वी असे ११ केंद्रे सुरु केली जाणार असल्याची माहिती रॉय यांनी दिली. पुणे विभागात मुंबई व विदर्भ वगळता इतर २२ जिल्ह्य़ांचा समावेश होतो. सन २००९ मध्ये पुण्यातील आकुर्डी कार्यालयात प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली सुरु करण्यात आली, नंतर त्यातील त्यातील त्रुटी दुर करुन देशभर राबवण्यासाठी स्वीकारण्यात आली. पुणे विभागातील औरंगाबाद, सोलापुरनंतर नगरला सुरु करण्यात आली आहे. करदाते आपली विवरणपत्रे, तक्रार अर्ज, चुकीच्या दुरुस्तीचे अर्ज प्राप्तीकर कार्यालयात देतात, नंतर त्याच्या चौकशीसाठी हेलपाटे मारतात, या तक्रार अर्जावर पुढे काय झाले, किती दिवसांत होईल याची करदात्यांना ‘सिटिझन चार्टर्ड’मधील अश्वासनाप्रमाणे, विशिष्ट मुदतीत कार्यवाही करण्यासाठी ही प्रणाली आहे. अर्ज दिल्यानंतर करदात्यांना एक क्रमांक दिला जाईल, तसेच सिटिझन चार्टर्डप्रमाणे कार्यवाही होती की नाही यासाठी त्यावर वरिष्ठांचे नियंत्रण असेल.
उद्घाटनप्रसंगी आयकर आयुक्त सुनीलकुमार मिस्त्रा, अप्पर आयुक्त सुनीता बिल्ला, सहाय्यक आयुक्त विनोद भास्करन, अधिकारी राजेश पाली तसेच ज्येष्ठ व्यापारी नेते हस्तीमल मुनोत, चार्टर्ड अकौंटंट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader