* मजुरांचा प्रश्न की अधिकाऱ्यांचीच उदासीनता?
* ३३१७ कामे अपूर्ण
* ६,७६१ मंजूर कामांना सुरुवातच नाही
केंद्र शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या जिल्ह्य़ात मंजूर १५,१२५ कामांपकी तब्बल ३,६१७ कामे अद्याप अपूर्ण आहेत. ६,७६१ कामे मंजूर असताना ती सुरूच करण्यात आली नसल्याने योजनेच्या मूळ उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम देण्यासाठी की, मलिदा लाटण्यासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, यात सडक अर्जुनी तालुक्यातील सर्वाधिक ७६.६५ टक्के कामे करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत मंजूर असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची माहिती जाणून घेतली असता १५,१२५ कामांना प्रशासकीय मंजुरी आहे. त्यातील ८,३६४ कामे सुरू करण्यात आली व ३,६१७ कामे अपूर्ण होती. जिल्ह्य़ातील या कामांचा आढावा दर्शविणारी २५ ऑगस्टपर्यंतची तालुकानिहाय आकडेवारी बघता गोंदिया तालुक्यात २,८३६ कामांना मंजुरी होती व त्यातील १,४५३ कामे सुरू करून यातील ९११ कामे पूर्ण करण्यात आली. तिरोडा तालुक्यात २६८६ कामांना मंजुरी होती. त्यातील १,२६१ कामे पूर्ण करण्यात आली. आमगाव तालुक्यात १,६४९ कामांना मंजुरी होती व त्यातील ८२५ कामे सुरू करून ४५३ कामे पूर्ण करण्यात आली. सालेकसा तालुक्यात १,२०९ कामांना मंजुरी होती व त्यातील ८८३ कामे सुरू करून ५३२ कामे पूर्ण करण्यात आली. देवरी तालुक्यात १,७७६ कामांना मंजुरी होती व त्यातील १,१८५ कामे सुरू करून ५८५ कामे पूर्ण करण्यात आली.
गोरेगाव तालुक्यात १,४०५ कामांना मंजुरी होती व त्यातील ७६१ कामे सुरू करून पूर्ण करण्यात आली. सडक अर्जुनी तालुक्यात १,८९८ कामांना मंजुरी होती व त्यातील १,१०५ कामे सुरू करून ८४७ कामे पूर्ण करण्यात आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यात १,६६५ कामांना मंजुरी होती व त्यातील ८९१ कामे सुरू करून ४४७ कामे पूर्ण करण्यात आली. एकंदर ४,७४७ कामे आठही तालुक्यात पूर्ण करण्यात आली. त्यातही सडक अर्जुनी तालुक्याची कामगिरी उल्लेखनीय असून, तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या कामांपकी सर्वाधिक ७७ टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, मंजूर कामांमधील ३,६१७ कामे मंजूर असूनही ती कामे सुरू करण्यात आली नसल्याने एकंदर योजनेअंतर्गत पाहिजे त्या प्रमाणात कामे होत नसल्याचे चित्र आहे.
लोकांच्या हाताला कामे मिळावी, या उद्देशातून ही योजना राबविली जात असतांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कामे अपूर्ण पडून असल्यानंतर यातून किती लोकांच्या हाताला कामे मिळाली, असा प्रश्न पडतो. यात विशेष म्हणजे, रोजगार हमी, पसा जास्त व काम कमी, ही म्हण या योजनेसाठी प्रसिद्ध आहे.