केंद्रीय लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवून दिल्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) वयोमर्यादा वाढवून द्यावी म्हणून प्रयत्न करण्याचे तसेच हा मुद्दा राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येईल अशी ग्वाही खा. समीर भुजबळ यांनी दिली आहे. विद्यार्थी कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानंतर खा. भुजबळ यांनी हे आश्वासन दिले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रम तसेच परीक्षेच्या स्वरुपात अमूलाग्र बदल केल्यामुळे विहीत वयोमर्यादेच्या सिमारेषेवर असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान टाळण्यासाठी आयोगाने वयोमर्यादेत वाढ करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपला अभ्यासक्रम व परीक्षेच्या स्वरुपात मोठय़ा प्रमाणावर बदल केले. ‘सी सॅट’चा पेपर नव्या परीक्षा पद्धतीत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे वयोमर्यादेच्या उंबरठय़ावर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला. नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध होईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी विहीत वयोमर्यादा पार केली. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. वयोमर्यादा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांनी यापूर्वीच वाढवून दिली असल्याचे कृती समितीने खासदारांच्या नजरेस आणून दिले. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या मुद्यांचा समावेश पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात करण्याची मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचा समावेश निवडणूक जाहीरनाम्यात करण्यास खासदारांनी अनुकूलता दर्शविली. त्यासाठी विद्यार्थी कृती समितीचे पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक एस. जी. गायकवाड यांनी पत्रकाव्दारे दिली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘एमपीएससी’साठीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचे आश्वासन
केंद्रीय लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवून दिल्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) वयोमर्यादा वाढवून द्यावी म्हणून प्रयत्न करण्याचे तसेच हा मुद्दा राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येईल अशी ग्वाही खा. समीर भुजबळ यांनी दिली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-03-2014 at 10:44 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in age limit for mpsc