महिलांचे दागिने खेचून नेण्याचा प्रकार वारंवार घडत असताना आता चोरटय़ांची हिंमत अधिकच वाढल्याचे लक्षात येते. जेलरोड येथे घराच्या आवारात शिरून एका महिलेचे मंगळसूत्र खेचून नेण्याचा प्रकार हे त्याचे निदर्शक. जेलरोडवरील पारिजातनगरमध्ये चंद्रिका परमेश्वर नायर यांच्या बाबत हा प्रकार घडला. श्वानाला भ्रमंती करून त्या घराजवळ पोहोचल्या होत्या. या वेळी दोन भामटय़ांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बंगल्याचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि नायर यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची चेन खेचली. बाहेर पायी चालत जाऊन संशयितांनी मग दुचाकीवरून पळ काढला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         

Story img Loader