मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मधुकरराव मुळे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित फुटबॉल स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, महाविद्यालयाचे सदस्य अजित मुळे यांनी खेळाडूंची स्फूर्ती पाहून रोख पारितोषिकाची रक्कम ५१ हजारांवरून ६१ हजार रुपये केली.
पहिल्या सामन्यात कोकणवाडी काली मस्जिद संघाने ६-५ गोलने विजय मिळविला. अरब बॉईज संघाकडून २ गोल केले गेले. के. के. एम. निसार व अनिस यांनी प्रत्येकी १ गोल करून संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात मिलन बॉईज संघाने ४-०, तर तिसऱ्या सामन्यात नोबेल स्पोर्ट्सने ४-० असा दणदणीत विजय मिळवला. चौथा सामना टाय झाला. पाचवा सामना अल-भडकल संघाने ६-१ असा एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना टाय झाला. दुसरा सामना एफ. के. फुटबॉल संघ विरुद्ध रोवर्स फुटबॉल संघ असा झाला. या सामन्यात रोवर्सने एकतर्फी विजय मिळविला. तिसऱ्या सामन्यात आझाद संघाने डिस्ट्रीक्ट कोचिंग सेंटरला ६-० अशी धूळ चारली. चौथ्या सामन्यात एन. यू. एफ. संघाने २-१ विजय मिळविला.  स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. उत्तम पांचाळ, क्रीडा विभाग व देवगिरी परिवाराने प्रयत्न केले.

Story img Loader