नागपूर महानगर परिवहन लिमिटेडने शहर बसभाडय़ात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने अखेर भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय पक्का केला. नवीन भाडेवाढीत पहिल्या टप्प्यातील भाडेवाढ स्थिर ठेवून चौथ्या टप्प्यातील वाढील मान्यता दिली. कमीत कमी १ रुपया आणि जास्तीतजास्त ४ रुपये अशी भाडेवाढ करण्यात आली आहे. जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला या भाडेवाढीचा तडाखा बसणार आहे. येत्या १ ऑगस्टपासून ही वाढ लागू होईल.
यात ६ ते ८ किमी अंतराच्या दरामध्ये १ रुपयाने वाढ केली असून मुलांना मात्र याच अंतरासाठी ५ रुपये कायम ठेवले आहेत. २२ ते २४ किमी अंतरासाठी ३० रुपये द्यावे लागत होते त्यात आता वाढ झाल्यामुळे ३४ रुपये द्यावे लागार आहे. परंतु, मुलांसाठी १ ते २ रुपये अधिक आहे.
 पारडी ते जयताळापर्यंत २२ रुपये द्यावे लागत होते तर आता २४ रुपये द्यावे लागणार आहेत. सीताबर्डी ते हिंगणा प्रवासासाठी १९ रुपयांऐवजी २१ रुपये, सीताबर्डी ते कामठी २२ रुपयांएवजी २४ रुपया, सीताबर्डी ते खापरखेडा ३२ रुपयांऐवजी ३४ रुपये, सीताबर्डी ते डिफेन्ससाठी १९ रुपयांऐवजी २१ रुपये, सीताबर्डी ते बुटीबोरी २८ रुपयांऐवजी ३० रुपये सीताबर्डी ते कळमेश्वरसाठी २८ रुपयांऐवजी ३० रुपये आणि सीताबर्डी ते जैन हॉस्पिटल कन्हानसाठी ३२ ऐवजी ३४ रुपये द्यावे लागणार आहेत. कमी अंतरावर प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे या दरवाढीचा कोणताच फायदा  स्टार बस ऑपरेटर होणार नाही.
डिझेलच्या दोन महिन्यात वाढलेल्या किमती यामुळे ही भाडेवाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती. बसेसच्या इंधनावर लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची तक्रार ऑपरेटरने केल्यामुळे एनएमपीएलच्या सूत्राने स्पष्ट केले होते. इंधन वाढ झाली तर तिकीट दरात वाढ करण्याची वंशनिमय आणि महापालिका यांच्यात एका करारानुसार सहमती झाली होती, दरवाढीचा प्रस्ताव सुद्धा त्यानुसार देण्यात आला होता, पण हा प्रस्ताव पाठविण्यास एनएमपीएलने उर्शीर केला होता. त्यामुळे दरवाढ  करण्यात आली. एनएमपीएलने काही दिवसापूर्वीच दरवाढीला मान्यता दिली होती. मगच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास आता मंजुरी मिळाली.

Story img Loader