विदर्भासाठी पावसाचा शुभसंकेत
विदर्भात सर्वदूर दमदार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्या सात दिवसांत मोठय़ा, मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील जलसाठय़ात ४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मोठय़ा प्रकल्पांमधील पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहचला आहे. पश्चिम विदर्भातील पेनटाकळी आणि खडकपूर्णा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये यंदादेखील पाणी साठवणूक सुरू झालेली नाही. विदर्भातील मध्यम आणि लघू प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस बरसल्याने पाणीसाठा वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांत विशेषत: अमरावती विभागातील लघू प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसंचय होऊ शकला नाही, पण तीन दिवसांच्या पावसातच लघू प्रकल्पांमध्ये जलसाठय़ात १४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली, हे शुभसंकेत मानले जात आहेत.
विदर्भातील बहुतांश मोठय़ा प्रकल्पांचे पाणलोट क्षेत्र हे मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशात चांगला पाऊस बरसल्यास अनेक प्रकल्पांमधील पाणीसाठय़ात वाढ नोंदवली जात असते. गेल्या वर्षी केवळ २० ते २५ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा तो ३३ ते ३५ टक्क्यांपर्यंत नोंदवला गेला आहे. काही प्रकल्प तुडुंब भरले असले, तरी अनेक प्रकल्पांसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्प आटले होते. त्यामुळे अनेक शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. आता मान्सूनच्या दोन टप्प्यांमध्ये चांगला पाऊस बरसल्याने पश्चिम विदर्भातील या प्रकल्पांमध्येदेखील समाधानकारक जलसाठा झाला आहे. अमरावती विभागातील ९ मोठय़ा प्रकल्पांची जलसाठवणूक क्षमता १५४० दशलक्ष घनमीटर आहे. मंगळवारी सकाळपर्यंत या प्रकल्पांमध्ये ५०५ दलघमी म्हणजे ३३ टक्के जलसंचय झाला होता. जून महिन्यातच हा आकडा गाठला गेल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सात दिवसांमध्ये जलसाठय़ात १ टक्क्याची वाढ आहे. विशेषत: बुलढाणा जिल्ह्य़ातील पेनटाकळी आणि खडकपूर्णा या प्रकल्पांमध्ये यंदादेखील पाणी अडवण्यात आलेले नाही. यवतमाळ जिल्ह्य़ातील पुस प्रकल्प आधीच तुडुंब भरला आहे. या प्रकल्पात ९१ दलघमी पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील १६ मोठय़ा प्रकल्पांची क्षमता २८५८ दलघमी आहे, सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये १००२ दलघमी म्हणजे ३५ टक्के जलसंचय झाला आहे. नागपूर जिल्ह्य़ातील कामठी खरी प्रकल्पात सर्वाधिक ८३ टक्के, गडचिरोली जिल्ह्य़ातील दिना प्रकल्पात ७९ टक्के पाणीसाठा आहे. गोसीखुर्दमध्ये ६३ टक्के पाणी अडवले गेले आहे. सात दिवसांमध्ये पाणीसाठय़ातील वाढ ही ३ टक्क्यांची आहे. विदर्भातील मध्यम प्रकल्पांमध्ये ३३९ दलघमी म्हणजे २७ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर लघू प्रकल्पांमध्ये ३७२ दलघमी म्हणजे २५ टक्के जलसंचय झाला आहे. मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा सात दिवसांमध्ये ९ टक्क्यांनी तर लघू प्रकल्पांमध्ये ४ टक्क्यांनी वाढला आहे.
प्रतिनिधी, अमरावती

सिंचन प्रकल्पांच्या जलसंचयात ४ टक्के वाढ
विदर्भासाठी पावसाचा शुभसंकेत विदर्भात सर्वदूर दमदार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्या सात दिवसांत मोठय़ा, मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील जलसाठय़ात ४
First published on: 26-06-2013 at 08:25 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in water level of irrigation projects