कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन व हमाल युनियन (लाल बावटा) यांच्यात जिनिंग आवारातील यंत्राद्वारे गठाण वाहतूक, तसेच प्रलंबित हमाली दरवाढीबाबतचा प्रश्न बाजार समितीचे सभापती आमदार संजय जाधव यांच्या मध्यस्थीने मार्गी लागला.
बाजार समितीत सभापती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित हमाली दरवाढीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. पूर्वीच्या कापूस हमाली दरात १० टक्के वाढ करून वराई दरात कोणतीही वाढ केली नाही. यंत्राद्वारे गठाण वाहतुकीचे काम केले जाणार नसून, वराईची रक्कम (मालमोटार व आयशर वाहन वगळता) बंद करण्यात आली. मालमोटार व आयशर वाहनांव्यतिरिक्त हमालांमार्फत वराईची रक्कम वसूल करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित हमालाचा तात्काळ परवाना निलंबित करणे, तसेच परवानगी देऊनही हमालांनी गाडी भरणा न केल्यास व्यापाऱ्यांमार्फत अन्य हमालांकडून गाडी भरणा झाल्यास त्याची रक्कम संबंधित हमालांनाच देण्याबाबत सभापतींनी निर्देशित केले.
संचालक गणेश घाडगे, कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशनचे सचिव पवन पुरोहित, कार्यक्षेत्रातील जििनगचे चालक-मालक व कापूस खरेदीदार अनिल अग्रवाल, गिरीश मुक्कावार, हरीष कत्रुवार, हमाल युनियनचे अध्यक्ष शेख महेबुब शेख फकीर, सरचिटणीस विलास बाबर आदी उपस्थित केले.
सभापतींची मध्यस्थी
हमाली दरवाढीचा
प्रश्न अखेर मार्गी
वार्ताहर, परभणी
कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन व हमाल युनियन (लाल बावटा) यांच्यात जििनग आवारातील यंत्राद्वारे गठाण वाहतूक, तसेच प्रलंबित हमाली दरवाढीबाबतचा प्रश्न बाजार समितीचे सभापती आमदार संजय जाधव यांच्या मध्यस्थीने मार्गी लागला.
बाजार समितीत सभापती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित हमाली दरवाढीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी बठक झाली. पूर्वीच्या कापूस हमाली दरात १० टक्के वाढ करून वराई दरात कोणतीही वाढ केली नाही. यंत्राद्वारे गठाण वाहतुकीचे काम केले जाणार नसून, वराईची रक्कम (मालमोटार व आयशर वाहन वगळता) बंद करण्यात आली. मालमोटार व आयशर वाहनांव्यतिरिक्त हमालांमार्फत वराईची रक्कम वसूल करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित हमालाचा तात्काळ परवाना निलंबित करणे, तसेच परवानगी देऊनही हमालांनी गाडी भरणा न केल्यास व्यापाऱ्यांमार्फत अन्य हमालांकडून गाडी भरणा झाल्यास त्याची रक्कम संबंधित हमालांनाच देण्याबाबत सभापतींनी निर्देशित केले.
संचालक गणेश घाडगे, कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशनचे सचिव पवन पुरोहित, कार्यक्षेत्रातील जििनगचे चालक-मालक व कापूस खरेदीदार अनिल अग्रवाल, गिरीश मुक्कावार, हरीष कत्रुवार, हमाल युनियनचे अध्यक्ष शेख महेबुब शेख फकीर, सरचिटणीस विलास बाबर आदी उपस्थित केले.
—————————-
परभणी मनपा रुग्णालयात
संसर्गजन्य रोग उपचार कक्ष
वार्ताहर, परभणी
शहर महापालिकेच्या वतीने जायकवाडी वसाहतीनजीक चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयात नव्याने संसर्गजन्य कक्ष कार्यान्वित करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे हे रुग्णालय चालविण्यात येते. डॉ. कल्पना सावंत येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दिमतीला आवश्यक कर्मचारी दिले असून शहरातील नागरिकांना घरपोच सुविधा देण्यासाठी ३४ परिचारिका आहेत. प्रत्येक परिचारिकडे १० हजार लोकसंख्येचा भाग आहे. शहरातील नागरिकांनी महापालिका रुग्णालयातील आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रताप देशमुख, आयुक्त एस. पी. सिंह, उपमहापौर सज्जुलाला आदींनी केले आहे.
——–
नूतन प्रशासकांचा दणका
कर्जफेडीची मुदत रद्द केल्याचे
‘गजानन’, ‘जयभवानी’ला पत्र
वार्ताहर, बीड
गजानन व जयभवानी सहकारी साखर कारखान्यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज ३ वर्षांच्या मुदतीत परत करण्याची दिलेली सवलत रद्द करून या कारखान्यांनी एकाच वेळी आपल्याकडील सर्वच कर्जबाकी बँकेत जमा करावी, असे पत्र नूतन प्रशासक ज्ञानेश्वर मुकणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणीदरम्यान दाखल केले. त्यामुळे या कारखान्यांच्या संचालकांना चांगलाच झटका बसला. गुन्हा दाखल झालेल्या संचालकांच्या याचिकेवर आता मंगळवारी (दि. ३) सुनावणी होणार आहे.
जिल्हा बँकेची विनातारण कर्जमंजुरी, तसेच थकीत कर्जप्रकरणी माजी प्रशासक शिवानंद टाकसाळे यांनी जिल्ह्य़ातील बडय़ा नेत्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. त्यामुळे टाकसाळे यांना सत्ताधारी नेत्यांनी राजकीय वजन वापरून प्रशासक पदावरून हटवले. त्यांच्या जागी आलेले ज्ञानेश्वर मुकणे आता आपल्या सोयीचे निर्णय घेतील, अशी या नेत्यांना अपेक्षा होती. मात्र, जिल्हाभरात जनतेचा रेटा वाढल्यामुळे मुकणे यांनीही राजकीय दबावाला बळी न पडता काम सुरू केल्याचे पहिल्याच झटक्यात दाखवून दिले.
राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित व धनंजय मुंडे यांच्यासह तब्बल डझनभर नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या सर्वाना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला असून, या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी चालू आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणी वेळी बँकेचे प्रशासक मुकणे यांनी न्यायालयात दोन कारखान्यांबाबत दिलेली कर्जफेडीची मुदत रद्द करून या कारखान्यांनी एकाच वेळी कर्ज परत करावे, असे पत्र दिले. राष्ट्रवादीचे नेते, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील गजानन सहकारी साखर कारखान्याकडे जवळपास १४ कोटी कर्ज थकीत असून, हे कर्ज फेडण्यासाठी बँकेने त्यांना ४ वर्षांची, तर राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या जयभवानी कारखान्याकडे २२ कोटी कर्ज असून या कारखान्याला कर्जफेडीसाठी दोन वर्षांची मुदत दिली आहे.
मात्र, प्रशासक मुकणे यांनी न्यायालयात पत्र देऊन ही मुदत रद्द करावी आणि दोन्ही कारखान्यांनी एकरकमी पसे भरावेत, अशी मागणी केल्यामुळे या कारखान्याच्या दिग्गजांना चांगलाच झटका बसला आहे. संचालकांच्या याचिकेवर आता ३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायलय काय निर्णय देते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
———————
गृहमंत्र्यांना निवेदन
‘पोलिसांच्या पाल्यांना
भरतीत आरक्षण हवे’
प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलीस दलात नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये पोलिसांच्या पाल्यांना १० टक्के आरक्षण देण्यात यावे, तसेच पोलिसांच्या पाल्यांसाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी अशा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून त्यात शैक्षणिक आरक्षण दिले जावे, आदी मागण्यांचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशनने गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दिले.
राज्यातील सर्व जिल्ह्य़ांच्या ठिकाणी पोलिसांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाची निर्मिती करावी, नाशिक व तासगावच्या धर्तीवर पोलीस प्रशिक्षण अकादमी मराठवाडय़ाची राजधानी औरंगाबादेत सुरू करावी, पोलीस कल्याण योजनेंतर्गत पोलिसांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा देणे रुग्णालयांना बंधनकारक करावे, पोलिसांच्या मुला-मुलींना उद्योग-व्यवसाय उभारणी करण्यासाठी बँकेकडून कर्ज दिले जावे, पोलिसांच्या पाल्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, शहीद पोलिसांच्या कुटुंबाला एस. टी. व रेल्वे प्रवास मोफत करावा, आदी मागण्या निवेदनात आहेत. संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य यांनी ही माहिती दिली.
———————-
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin:0in;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:10.0pt;
font-family:”Times New Roman”;
mso-ansi-language:#0400;
mso-fareast-language:#0400;
mso-bidi-language:#0400;}