कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन व हमाल युनियन (लाल बावटा) यांच्यात जिनिंग आवारातील यंत्राद्वारे गठाण वाहतूक, तसेच प्रलंबित हमाली दरवाढीबाबतचा प्रश्न बाजार समितीचे सभापती आमदार संजय जाधव यांच्या मध्यस्थीने मार्गी लागला.
बाजार समितीत सभापती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित हमाली दरवाढीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. पूर्वीच्या कापूस हमाली दरात १० टक्के वाढ करून वराई दरात कोणतीही वाढ केली नाही. यंत्राद्वारे गठाण वाहतुकीचे काम केले जाणार नसून, वराईची रक्कम (मालमोटार व आयशर वाहन वगळता) बंद करण्यात आली. मालमोटार व आयशर वाहनांव्यतिरिक्त हमालांमार्फत वराईची रक्कम वसूल करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित हमालाचा तात्काळ परवाना निलंबित करणे, तसेच परवानगी देऊनही हमालांनी गाडी भरणा न केल्यास व्यापाऱ्यांमार्फत अन्य हमालांकडून गाडी भरणा झाल्यास त्याची रक्कम संबंधित हमालांनाच देण्याबाबत सभापतींनी निर्देशित केले.
संचालक गणेश घाडगे, कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशनचे सचिव पवन पुरोहित, कार्यक्षेत्रातील जििनगचे चालक-मालक व कापूस खरेदीदार अनिल अग्रवाल, गिरीश मुक्कावार, हरीष कत्रुवार, हमाल युनियनचे अध्यक्ष शेख महेबुब शेख फकीर, सरचिटणीस विलास बाबर आदी उपस्थित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा