जिल्ह्य़ात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसला तरी प्रकल्पांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत यंदा काहीशी वाढ झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
मागील वर्षी आठ जुलैअखेर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २४.४६ टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण ४४.५१ टक्के आहे. अनेर, हतनूर, सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा या पाचही प्रकल्पांतून लाखो क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. हतनूरचे ३६, तर अनेरचे दहा आणि अन्य प्रकल्पांचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणांची नावे, त्यांची पाणी साठविण्याची क्षमता व कंसात सध्याचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे- पांझरा- क्षमता १२५८.८७ दशलक्ष घनफूट (आजचा उपयुक्त साठा १.२७ टक्के), मालनगाव ४००.१२ (०.५९), जामखेडी ४३५.७९ (०.४१), कनोली २९८-४१ (शून्य), बुराई ५०१.८३ (५.२८), करवंद ७३२.०७ (२०.७३), अनेर २०९१.०० (१४.५७), सोनवद ५०७.१२ (शून्य), रंगावली ४५५.२१ (१.६६), लघु प्रकल्पांमध्ये राणीपूर ८९.६९ (१.५४), मुकटी ३५९.८६ (१.६६), माणिकपुंज ३३४.७८ (२.७०), अमरावती ७५०.३३ (शून्य), शिवण ७२९.४३ (३.६५), दरा ४७४.९८ (८.७५), अक्कलपाडा ३१३६.६७ (शून्य), वाडीशेवाडी ११९७.५३ (शून्य), सुलवाडे २२९७.५९, सारंगखेडा ३२४२.२७ (शून्य), प्रकाशा २१९३.४१ (शून्य) याप्रमाणे जलसाठय़ाची स्थिती आहे. पांझरा, मालनगाव व जामखेडी या धरणांतून पांझरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. या तिघा धरणांमध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्य़ात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही.
धुळे जिल्ह्यतील जलसाठय़ात वाढ
जिल्ह्य़ात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसला तरी प्रकल्पांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत यंदा काहीशी वाढ झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. मागील वर्षी आठ जुलैअखेर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २४.४६ टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण ४४.५१ टक्के आहे. अनेर, हतनूर, सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2013 at 09:52 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase water level in dhule distrect