जीवनदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्ताच्या कि मतीतही आता भरमसाठ वाढ झाली आहे. शासकीय रक्तपेढीत ४५० रुपयाला मिळणारी रक्ताची एक पिशवी आता १०५० रुपयांत तर खासगी रक्तपेढीत ८५० रुपयाला मिळणारी रक्ताची पिशवी आता १४५० रुपयांना खरेदी करावी लागणार आहे.
      रुग्णाला निकोप रक्त पुरवठा करणे हे शासकीय व निमशासकीय रक्तपेढीचे कर्तव्य आहे. प्राप्त रक्तावर विविध चाचण्या केल्यानंतरच ते रक्त रुग्णाला उपलब्ध करून दिले जाते. परंतु रक्ताच्या विविध चाचण्या करण्यांसाठी खर्चाचे प्रमाण वाढले असल्याने जुन्या किमतीत रक्त विकणे हे रक्तपेढींना नुकसानीचे ठरू लागले. त्यामुळे ‘दि फेडरेशन ऑफ नागपूर ब्लड बँक’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली. विविध चाचण्यांचा खर्च वाढल्याने दरात वाढ करण्याचे आदेश राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेला द्यावे, अशी विनंती याचिकेत केली होती. या प्रकरणी एक समिती स्थापन करावी व या समितीने रक्ताचे दर ठरवावे व त्याला राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने मंजुरी द्यावी, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेला न्यायालयाने दिले होते.
त्यानुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्त व रक्त घटकांची प्रक्रिया, चाचणी शुल्कात सुधारणा करण्यासाठी खासगी रक्तपेढी, रेड क्रॉस सोसायटी, शासकीय रक्तपेढी, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली १६ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने रक्ताच्या विविध चाचण्यासांठी किती खर्च येतो, याचा अभ्यास करून रक्ताचे सुधारित दर निश्चित केले. त्यानंतर सुधारित सेवा शुल्काचा हा प्रस्ताव राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने हिरवी झेंडी दाखवली आहे. या दरानुसार आता खासगी रक्तपेढय़ांमध्ये रक्ताची एक पिशवी १४५० रुपये देऊन विकत घ्यावी लागणार आहे. रेड सेल (लाल घटक) असलेले रक्तही आता १४५० रुपये देऊनच खरेदी करावे लागणार आहे. प्लाझमा आणि प्लेटलेटच्या दरात मात्र वाढ करण्यात आली नाही. याचे दर ४०० रुपये प्रति युनिटच ठेवण्यात आले आहे. शासकीय रक्तपेढीत रक्ताची एक पिशवी ४५० रुपयाला मिळत होती. ती सुधारित दरानुसार आता १०५० रुपयाला मिळणार आहे. त्यानुसार रेड सेल (लाल घटक) सुद्धा १०५० रुपये देऊन घ्यावे लागणार आहे. शासकीय रक्तपेढीत प्लाझमा आणि प्लेटलेटच्या किंमती मात्र कमी करण्यात आल्या आहेत. पूर्वी ४५० रुपयात उपलब्ध होणारे प्लाझमा आणि प्लेटलेट ३०० रुपयात उपलब्ध होणार आहेत. थॅलेसिमिया, हिमोफेलिया व सिकलसेल अ‍ॅनेमिया आजाराने बाधित रुग्णास राज्यातील शासकीय व खासगी रक्तपेढय़ांनी मोफत रक्त पुरवठा करण्याचे बंधन राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने घालून दिले आहेत.

किमती वाढवणे आवश्यक होते -डॉ. वरभे
रक्तदात्याकडून रक्त गोळा केल्यानंतर एचआयव्ही, हिपेटायटीस बी व सी, मलेरिया आणि गुप्तरोग या पाच चाचण्या कराव्या लागतात. या चाचण्या करण्याचा खर्च वाढला. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर खासगी बँका चालतात. परंतु खर्च वाढला असल्याने रक्ताचे दर वाढवून द्यावे, अशी मागणी पुढे आली. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने वाढीव रक्त दराला मंजुरी प्रदान केली असल्याची माहिती लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीष वरभे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सुधारित दराचा काढलेला अध्यादेश आमच्यापर्यंत पोहचला नसल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रक्तपेढीचे संचालक डॉ. संजय पराते यांनी सांगितले.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Robotic assisted Surgery at Fortis Hospital
हृदयविकाराच्या रुग्णावर केली रोबोटिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया!
Story img Loader