मैदानावरील वेगवान खेळाने फुटबॉलरसिकांची मने जिंकणारा ब्राझिलचा सुपरस्टार रोनाल्डिन्हो आता अॅनिमेशनपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. त्यासाठी भारतात आलेल्या रोनाल्डिन्होने ‘भारतातील वातावरण पाहता हे आपले दुसरे घर असल्याची’ भावना व्यक्त केली.
‘बाला एंटरटेन्मेंट’ या चित्रपटनिर्मिती संस्थेतर्फे बनविण्यात येणाऱ्या ‘आर- १० द मूव्ही’ या अॅनिमेशनपटात रोनाल्डिनोची मध्यवर्ती भूमिका असणार आहे. आर- १० नावाचा नायक फुटबॉल कौशल्यांचा वापर करून परग्रहवासीयांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो; अशी या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट मे २०१४ मध्ये फुटबॉल वर्ल्डकपचे निमित्त साधून प्रदर्शित करण्यात येणार आहे.
बाला एंटरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी राव यांनी शुक्रवारी या चित्रपटाची घोषणा केली. रोनाल्डिनो, ‘व्यंकटेश्वरा हॅचरीज ग्रुप’चे बी. व्यंकटेश राव, ‘असीस मोरोरा ग्रुप’चे असीस मोरेरा या वेळी उपस्थित होते.
रोनाल्डिनो म्हणाला, ‘‘भारतात आणि पुण्यात झालेल्या स्वागताने मी भारावलो आहे. भारत बऱ्याच अंशी ब्राझीलसारखाच असल्याचे मला वाटले. त्यामुळे इथे दुसऱ्या घरी आल्याचीच माझी भावना आहे. हा चित्रपट येईल तेव्हा फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन ब्राझीलकडे आहे. त्यामुळे फुटबॉलवरील चित्रपटही तेव्हाच प्रदर्शित होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’’
‘भारत हे तर माझे दुसरे घर’
मैदानावरील वेगवान खेळाने फुटबॉलरसिकांची मने जिंकणारा ब्राझिलचा सुपरस्टार रोनाल्डिन्हो आता अॅनिमेशनपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. त्यासाठी भारतात आलेल्या रोनाल्डिन्होने ‘भारतातील वातावरण पाहता हे आपले दुसरे घर असल्याची’ भावना व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-12-2012 at 04:21 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India is my second home