भारत सध्या विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या पायरीवर उभा आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुका या त्यादृष्टीने महत्त्वाच्या असल्याचे रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत ए. ए. नोव्हीकॉव्ह यांनी म्हटले आहे. तसेच भारताला एक स्थिर व शक्तीमान देश म्हणून पाहण्याची रशियाची इच्छा असल्याचेही त्यांनी नूमद केले.
रशियाच्या राज्यघटनेच्या स्वीकृतीचा वर्धापन दिन नुकताच रशियन वकिलातीत साजरा झाला. त्यावेळी नोव्हीकॉव्ह बोलत होते. १९९३ मध्ये रशियाचे विघटन झाले. विसाव्या शतकातील ती सर्वात मोठी राजकीय दुर्घटना होती असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे मत आहे. रशियाच्या राज्यघटनेने कायद्यांपेक्षा मानवी अधिकारांना अधिक महत्त्व असल्याचे जाहीर केले आहे. त्यातूनच विघटनानंतर रशियात नागरी युद्ध भडकले नाही की यादवी माजली नाही, असे नोव्हीकॉव्ह यांनी स्पष्ट केले.
रशियाच्या नेतृत्वामुळेच भारताला इराणबरोबरचे सहकार्य वाढवता आले. ऊर्जेबाबत द्विपक्षीय सहकार्य करता आले. भारतानेही रशियाच्या या मदतीची जाणीव ठेवली आहे. रशिया व भारत या दोन्ही देशांचा विचार करता आंतरराष्ट्रीय सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचेही नोव्हीकॉव्ह म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा