आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने आयुर्वेद व्यासपीठतर्फे ६ जानेवारीला ‘आयुर्वेदाची बलस्थाने आणि पुढील आव्हाने’ या विषयावर अखिल भारतीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात देशभरातील आयुर्वेद तज्ज्ञ यात सहभागी होणार असल्याची माहिती आयुर्वेद चिकित्सक वैद्य जयंत देवपुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी १९९८ मध्ये आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेची स्थापना करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये संस्थेच्या शाखा आहेत. संस्थेतर्फे अनेक कार्यशाळा आणि आयुर्वेदाची पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे. दोन दिवस होणाऱ्या या परिषदेमध्ये आयुर्वेदाची बलस्थाने आणि आव्हाने या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या परिषदेमध्ये आयुर्वेदचे शिक्षण घेणारे विद्यार्थी शोधप्रबंध सादर करणार असून त्यातील उत्कृष्ट शोधप्रबंधाला वैद्य सिद्धेश्वर शास्त्री वडोदकर पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
रेशीमबागमधील स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे उद्घाटन ६ जानेवारीला सकाळी ९ वाजता महापौर अनिल सोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आयुर्वेद व्यासपीठचे अखिल भारतीय अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर उपस्थित राहतील. या परिषदेमध्ये मणिपाल विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. बी. एम. हेगडे, महाराट्र आयुर्विज्ञान विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. रवी बापट, मुंबईच्या केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक, आयुर्वेद महाविद्यालयाचे संचालक गोविंदप्रसाद उपाध्याय, आयुर्वेद चिकि त्सक वैभव मेहता, हितेश जानी, जयंत देवपुजारी यांची व्याख्याने होणार आहेत.  परिषदेला भारतातून ३ हजारच्या जवळपास प्रतिनिधी उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला आनंद टेभुर्णीकर, राजेश गुरू, मृत्यूंजय शर्मा, रत्नाकर धामनकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा