भारतीय हवाई सीमांचे संरक्षण असो वा पूर, भूपंक, त्सुनामी, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपदेत देशवासियांच्या सेवेत सदैव तत्पर आणि कर्तव्यदक्ष असलेल्या भारतीय हवाई दलास मायेने संगोपन आणि तितक्याच शिस्तबद्धतेने दुरुस्त ठेवण्याची मोठी जबाबदारी नागपुरातील हवाई दलाचे मेन्टनन्स कमांड करीत आहे. त्या अर्थाने मेन्टनन्स कमांड हे हवाई दलाचे ‘मदर कमांड’ ठरले आहे. भारतीय हवाई दलास उद्या, बुधवारी ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हवाई दलाच्या देशभरातील सातही कमांडमध्ये आठवडभरापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
हवाई दलाचे देशभरात पाच ऑपरेशनल कमांड आणि एक ट्रेनिंग कमांड आहे. या संपूर्ण कमांडला, विमान, हेलिकॉप्टर, रडार आणि तांत्रिक मदत नागपुरातील मेंटनन्स कमांड करीत असते. भौगौलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहरात या कमांडचे मुख्यालय असून, त्याचे देशभरात विविध ठिकाणी असलेल्या बेस रिपेअर डेपो आहेत. नागपुरातील मुख्यालयात प्रामुख्याने पॉलिसी आणि प्लॅनिंगचे काम होते. हवाई दलातील युद्धविमाने, हेलिकॉप्टर, रडार, पॅराशुट आदींची उपलब्धता, त्याची देखभाल दुरुस्ती, निगा सारखी सर्व महत्त्वाच्या कामांचे नियोजन नागपुरात मुख्यालयात होत असते.
विमानांची मोठी दुरुस्ती आणि ठराविक काळात केली जाणारी संपूर्ण देखभाल दुरुस्ती केली जाते. याशिवाय ग्राऊंड एन्व्हारमेंट सिस्टम, एसएजीडब्ल्यू सारख्या मिसाइल आणि एअर डिफेन्स रडार दुरुस्ती करण्यात येते. या कमांडमार्फत मोठा साठा आणि हवाई दलाच्या सर्व उपकरणे, सुटे भाग आणि फिल्ड इन्फारमेशन पुरविली जाते. युद्धविमानांचा सुटय़ा भागांचे, मिसाइल, रडार, विमानांना सहाय्यक वाहने आणि ग्राऊंड सपोर्ट सिस्टमचे स्वदेशीकरण करण्याची मोठी जबाबदारी या कमांडवर आहे. त्यामुळे मेंटनन्स कमांड ‘मदर कमांड ऑफ एअर फोर्स’ असल्याचे विंग कमांडर अशोक मोटे (निवृत्त) म्हणाले.
नागपुरातील मुख्यालय हवाई दलाचे ‘मदर कमांड’
भारतीय हवाई सीमांचे संरक्षण असो वा पूर, भूपंक, त्सुनामी, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपदेत देशवासियांच्या सेवेत सदैव तत्पर आणि कर्तव्यदक्ष असलेल्या भारतीय हवाई दलास मायेने संगोपन आणि तितक्याच शिस्तबद्धतेने दुरुस्त ठेवण्याची मोठी जबाबदारी नागपुरातील हवाई दलाचे मेन्टनन्स कमांड करीत आहे. त्या …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-10-2014 at 08:19 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian air force mother command in nagpur