वेदप्रणित भारतीय तत्वज्ञान हे जगासाठी उपयुक्त असल्याचे मत विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू रिपुसूदन श्रीवास्तव यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले.
पारनेर येथील पूर्णवाद शिक्षण प्रसारक मंडळ व पूर्णा येथील श्रीगुरू बुद्घीस्वामी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५७ व्या अखिल भारतीय तत्वज्ञान परिषेदेच्या उदघाटनप्रसंगी श्रीवास्तव बोलत होते. पुर्णवाद वर्धिष्णू विष्णूमहाराज पारनेरकर, शिवाचार्य स्वामी नंदकिशोर महाराज, एस. एस. दुबे, डॉ. अंबिकादत्त शर्मा, आमदार विजय औटी, डॉ. शरद पारळकर,परिषदेचे स्वागताध्यक्ष माजी न्यायमुर्ती संभाजी म्हसे आदी उपस्थित होते. दर्शन म्हणजेच तत्वज्ञान असल्याने सांगून डॉ. श्रीवास्तव यावेळी म्हणाले, दर्शन शब्दातील आपलेपणा स्नेहाची भावना वर्धिष्णू करतो़  गेल्या सत्तावन्न वर्षांपासून दर्शन परिषदेच्या माध्यमातून वेदप्रणीत भारतीय तत्वज्ञान रूजविण्याचे काम अखंडपणे सुरू असून हिंदी भाषेच्या माध्यमातून हे कार्य असेच पुढे सुरू राहणार आहे. बुद्घीवाद्यांची संख्या कमी झाल्याचे सांगितले जाते, मात्र बुद्घीवादी वाढले तर गुणवत्ता कमी होते असे त्यांनी स्पष्ट केले.
वेदमंत्राचा जागर, स्वागतगीत तसेच दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. पुर्णवादभुषण गुणेश पारनेरकर यांनी कार्यक्रमाचे नेटके सुत्रसंचलन केले. त्यास उपस्थितांनी वेळोवेळी दाद दिली. भारतीय दर्शन परिषेदच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. परिषदेच्या वेगवेगळया ग्रंथांचे तसेच विविध मासिंकाचे यावेळी विमोचन करण्यात आले. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या वंदे जननी या गिताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा