पासधारकांना खिशाला झळ बसणार
इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ आणि तोटा यांची भरपाई करण्यासाठी राज्य शासन आणि परिवहन महामंडळाने बस प्रवासी दरात साडे सहा टक्के वाढ करत मार्ग काढला असला तरी या भाडेवाढीविरोधात प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
काही दिवसांपासून इंधन, टायरचे वाढलेले दर, महामंडळाचा तोटा आणि कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली पगारवाढ यामुळे भाडेवाढ करणे क्रमप्राप्त झाले होते असे महामंडळाचे म्हणणे आहे. भाडेवाढीचा फटका शहर व ग्रामीण भागातील प्रवाशांना कमीत कमी बसेल याची दक्षता महामंडळाच्या वतीने घेण्यात आली असली तरी पासधारकांना याची झळ बसणार आहे. सहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांचे अर्धे भाडे, ग्रामीण मार्गावर उपटप्प्यांची सवलत, वार्षिक सवलत, कार्डवरील सवलत, विविध घटकांना देण्यात येणारी सवलत यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शहरी भागात किमान एक रुपयापासून कमाल पाच रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
एसटीची प्रवासनिहाय भाडेवाढ पुढीलप्रमाणे-(अनुक्रमे सर्वसाधारण जलद, निमआराम, रातराणी यांचे नवीन भाडे, कंसात जुने भाडे) मुंबई १७८ (१६७), २४२ (२२३), २०९ (१९५), पुणे २०७ (१९४), २८१ (२५९), २४३ (२२७), दादर १७३ (१६२), २३४ (२१६), २०३ (१८९), औरंगाबाद १९५ (१८४), २६५ (२४५), २३० (२१४), बोरीवली १७३ (१६२), २३४ (२१६), २०३ (१८९), अहमदनगर १६७ (१५७), २२६ (२०९), १९६ (१८३), धुळे १५५ (१४६), २११ (१९४), १८२ (१७०), सप्तशृंगगड ७५ (७०), १०१ (९४), ८८ (८२), जळगाव २४७ (२३२), ३३५ (३१०), २९०(२७१), मनमाड ८६ (८१), ११७ (१०८), १०१ (९५), शिर्डी ९८ (९२), १३३ (१२२), ११५ (१०७), मालेगाव १०९ (१०३), १४८ (१३७),१२३ (१२०), चोपडा २३० (२१६), ३१२ (२८८), २७० (२५२), त्र्यंबकेश्वर २९ (२७), ३९ (३६), ३४ (३२), सिन्नर २९ (२७), ३९ (३६), ३४ (३२), नांदगाव ११५ (१०८), १५६ (१४४), १३६ (१२६), इगतपुरी ४६ (४३), ६२ (५८), ५४ (५०), पेठ ५८ (५४), ७८ (७२), ६८ (६३), लासलगाव ६३ (५९), ८६ (७९), ७४ (६९), पिंपळगाव बसवंत ३५ (३२), ४७ (४३), ४१ (३८), सटाणा ९२ (८६), १२५ (११५), १०८ (१०१), येवला ८६ (८१), ११७ (१०८), १०१ (९५), कळवण ८१ (७६), १०९ (१०१), ९५ (८८) याप्रमाणे आहे. यामध्ये आरक्षण शुल्काचा समावेश नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा