मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात विश्रामबाग येथे तेजस मारुती हाले या पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील भटकी कुत्री पकडण्याची मोहीम आज हाती घेतली. पिसाळलेल्या कुत्र्यांना दयामरण देण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची मदतही महापालिका घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापालिका क्षेत्रात सुमारे पाच हजार भटकी कुत्री आहेत. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेचे डॉग व्हॅनसह पथक तनात आहे. बालकाचा दोन दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्याच्या हल्ल्याने मृत्यू झाला.  याबाबत शहरवासीयांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महापौर कांचन कांबळे यांनी आरोग्य विभागाची बठक घेऊन झाडाझडती घेतली. महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम तात्काळ हाती घ्यावी असे आदेश महापौरांनी दिले. यासाठी दोन पथके तनात करण्यात आली असून ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.
प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले, की भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बजिीकरण करणे आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना दयामरण देणे यासाठी स्वयंसेवी संस्थेने मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.